राज्यातील साडेबारा लाख आरटीपीसीआर किट्स बोगस; आमदार लोणीकरांची राज्यपालांकडे तक्रार
खरेदी केलेले किट्स आरटीपीसीआर लॅबच्या तपासणीत जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत.
जालना : महाराष्ट्र् सरकारने राज्यात 12 लाख 50 हजार आरटीपीसीआर किट्स खरेदी केले (Bogus RTPCR Kits) असून हे बोगस, डुप्लीकेट असल्याची तक्रार माजी मंत्री विदमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. राज्याचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, मुख्य सचिवाकडे त्यांनी तक्रार केली (Bogus RTPCR Kits).
खरेदी केलेले किट्स आरटीपीसीआर लॅबच्या तपासणीत जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. आयएमसीआरच्या या तपासणीत हे किट बोगस आणि सदोष असल्याचं सिद्ध झाल्याची माहिती देखील माजी मंत्री लोणीकरांनी दिली. ही लपवालपवी कश्यासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राचा कोरोनाचा आकडा 15 लाखाच्या पुढे गेला आहे आणि देशात सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे लपविण्यासाठी बोगस किट खरेदी करण्यात आले आहेत, असा आरोप माजी मंत्री लोणीकरांनी केला आहे. साडे पाच महिने 100 लोकांची तपासणी केली तर 35 पॉझिटिव्ह यायचे आता 100 लोकांची तपासणी केली तर सहा ते 15 पॉझिटिव्ह येतात.
ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊ लागले आहेत. अशा प्रकारच्या महाराष्ट्रभरातून डॉक्टरांनी तक्रारी केल्या आहेत आणि म्हणून जनतेच्या जीवाशी खेळू नका, कोरोनाशी खेळू नका अशा प्रकारची तक्रार केली असल्याचं माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी म्हटलं.
Dharavi Pattern | धारावीतील कोरोना पॅटर्नची ‘ऑक्सफर्ड’कडून दखल, तर अहमदनगरच्या सुपुत्राचेही कौतुक https://t.co/soR8jgWpav #Oxford @Vijaykulange #dharavi
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
Bogus RTPCR Kits
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | मुंबईत प्रतिबंधित इमारतींची संख्या वाढतीच, कोणत्या विभागात किती इमारती?
Dharavi Corona | मुंबईला आणखी एक प्रशस्तीपत्र, WHO पाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेकडून कौतुक