Uddhav Thackeray : धनुष्यबाण सेनेपासून वेगळा होऊच शकत नाही, कशाच्या आधारावर म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनेने साध्या माणसांनाही मोठं केले पण ते आज सोडून गेले तर सच्चा शिवसैनिक आजही सोबत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने आतापर्यंत राजकीय पार्श्वभूमी न पाहता सर्वसामान्यांना मोठे केले आहे. त्यामुळे जे गेले त्यामुळे काही फरक पडणार तर नाहीच पण सर्वसामान्यातून पुन्हा नेतृत्व घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई : दिवसेंदिवस (Shivsena) शिवसेनेतून बंडखोरीचे प्रमाण वाढत आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून आता धनुष्यबाणाचे चिन्हही पक्ष गमावणार असे चित्र निर्माण झाले होते. शिवाय पक्ष प्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनीही नव्या चिन्हासाठी तयार रहा असेही सांगितले गेल्याच्या चर्चा होत्या मात्र, धनुष्यबाण हा सेनेपासून कोणी वेगळा करु शकणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आपण हे हवेत बोलत नसून (Legal expert) कायदेतज्ञांशी बोलणे झाल्यानंतर ह्या विधानावर आलो असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेतून बंडखोरी वाढत असतानाच चिन्हाबाबत अफवा पसरत असल्याने उद्धव ठाकरे यांनीच याबाबत सर्वासमोर येऊन सांगितले आहे. त्यामुळे आता तरी नव्या चिन्हाचा विचार नसल्याचे ठाकरे म्हणाले आहे.
धनुष्यबाण कोणी हिरावू शकत नाही
शिवसेनेचे चिन्ह हा धनुष्यबाण आहे. यावरच गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय 11 जुलै रोजी यासंबंधी न्यायालयात निकाल होणार आहे. पण न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. शिवाय शिवसेना आणि धनुष्यबाण हे वेगळेच होऊ शकत नाही. कायद्यानुसार धनुष्यबाणाला कोणी हिरावू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यासंबंधी आपण अनेक कायदेतज्ञांशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. घटनेनुसार कोणीही धनुष्यबाण हिरावू शकत नसल्याचेही ठाकरे म्हणाले.
बंडखोरीला बसेल का आळा
बंडखोरांची वाढती संख्या आणि शिवसेनेच्या चिन्हाबाबत राज्यात होत असलेली संभ्रमता या दोन्हीमुळे पक्षातील अडचणी वाढत आहेत. यातच पश्रप्रमुख यांनी नव्या चिन्हाबाबत विचार केला जाऊ शकतो त्यानुसार तयारीला लागा असा संदेश दिल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे बंडखोरांची संख्या वाढत नाही ना. त्यामुळे राज्यात होत असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना उद्धव ठाकरे यांनीच पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे बंडखोरीला आळा बसेल का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साध्या माणसांनाही मोठं केले
शिवसेनेने साध्या माणसांनाही मोठं केले पण ते आज सोडून गेले तर सच्चा शिवसैनिक आजही सोबत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने आतापर्यंत राजकीय पार्श्वभूमी न पाहता सर्वसामान्यांना मोठे केले आहे. त्यामुळे जे गेले त्यामुळे काही फरक पडणार तर नाहीच पण सर्वसामान्यातून पुन्हा नेतृत्व घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, ह्या एका वाक्यातून उद्धव ठाकरे यांनी अनेक बंडखोरांना टोला लगावला आहे.