Devendra Fadnavis: भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण! भाजपकडून फडणवीसांवर बळजबरी! ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप

Maharashtra Political Crisis : 'पंतप्रधान स्पर्धेमधून हटविण्यासाठी नितीन गडकरीच्या चारीत्र हननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेले तीन वर्षापासून...

Devendra Fadnavis: भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण! भाजपकडून फडणवीसांवर बळजबरी! ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप
काय म्हणाले गोविंद कुलकर्णी?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 12:30 PM

बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राज्याचे मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) करण्यात आलं. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शपथ घेतली. यावर आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण होतंय, असा आरोप करण्यात आला आहे. अखिर भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे. ब्राह्मण महासंघाच्या फेसबुक पोस्टवर गोविंद कुलकर्णी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी या फेसबुक पोस्टवर कमेंटही केल्या असून या पोस्टवरुन सोशल मीडियात चर्चांना उधाण आलंय. ‘पंतप्रधान स्पर्धेमधून हटविण्यासाठी नितीन गडकरीच्या चारीत्र हननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेले तीन वर्षापासून भाजपातील तथाकथीत नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडविण्याकरीता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले’ अशा शब्दात टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलंय गोविंद कुलकर्णी यांनी?

आत्ता फडणविस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेचा दारापर्यंत पोहचविले. नंतर मा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री पदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविल्यानंतर भाजपातील वरीष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आले आहे. भाजपा मध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कायस्थान चाललेलं निदर्शनात येत आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

बंडखोरी ते मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा आशयाचे पोस्टरही राज्यात अनेक ठिकाणी लागले होते. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानात खुद्द फडणवीस यांनी काल त्यांच्या समर्थकांना धक्का दिला होता.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

मी मंत्रिमंडळात नसेल, एकनाथ शिंदे हे मुख्मयंत्री असतील, मी बाहेरुन सरकारची जबाबदारी घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. ते जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, यानंतर काही वेळातच घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आवाहन केलं.

तसंच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही याबाबत त्यांना सूचना केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता या राजकीय ट्वीस्टला मोदी-शाह यांचा मास्टरस्ट्रोक मानला जातोय. तर दुसरीकडे फडणवीस यांचे समर्थक आणि ब्राह्मण महासंघाकडून मात्र याबाबत थेट आता नाराजी व्यक्त केली जात असल्याचं दिसून आलंय.

वाचा राज्यातील राजकीय घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स :Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.