Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी पंगा, संसदेत कुस्तीचा आखाडा… खासदारांनी एकमेकांना उचलून फेकले… अध्यक्ष पाहतच राहिले…

भारतासोबत पंगा घेतलेल्या देशाच्या संसदेत अशी काही घटना घडली की त्यामुळे त्या देशाची नाचक्की झाली. इथल्या संसदेत थेट कुस्तीचा आखाडाच रंगला. संसदेतील खासदारांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना लाथा-बुक्क्यानी मारहाण केली. एकमेकांना उचलून जमिनीवर फेकले.

भारताशी पंगा, संसदेत कुस्तीचा आखाडा... खासदारांनी एकमेकांना उचलून फेकले... अध्यक्ष पाहतच राहिले...
MALDIV SANSAD Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 11:22 PM

मालदीव | 28 जानेवारी 2024 : संसदेमध्ये विविध पक्षांच्या सदस्यांचे एकमेकांशी मतभेद असतात. त्यावरून वारंवार जोरात वाद विवाद होत असतात. पण, संसदेच्या सदस्यांना कधी दुसऱ्या पक्षाच्या सदस्यांनी मारझोड केल्याची उदाहरणे तशी दुर्मिळच. मात्र, भारतासोबत पंगा घेतलेल्या देशाच्या संसदेत अशी काही घटना घडली की त्यामुळे त्या देशाची नाचक्की झाली. इथल्या संसदेत थेट कुस्तीचा आखाडाच रंगला. संसदेतील खासदारांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना लाथा-बुक्क्यानी मारहाण केली. एकमेकांना उचलून जमिनीवर फेकले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताशी पंगा घेणाऱ्या मालदीव देशाचा संसदेत ही घटना घडली आहे. मालदीवचे नवे अध्यक्ष मुइज्जू हे गेल्या वर्षी निवडून आले आहेत. अध्यक्ष मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी मालदीवच्या संसदेत मतदान होणार होते. रविवारी दुपारची वेळ यासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या मतदानाला विरोधी पक्षांनी विरोध केला होता.

विरोधी पक्षांनी मतदानापूर्वी स्पीकरच्या खोलीत पोहोचून त्यांची भेट घेतली. हे मतदान रोखण्याची विनंती केली. पण, सभागृहात मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामुळे विरोधक संतापले आणि त्यांनी स्पीकरच्या खुर्चीजवळ जात गोंधळ घालण्यास सुरवात केली. विरोधकांनी मतदान पत्रिकाही हिसकावून घेत आपल्या ताब्यात घेतल्या.

दुसरीकडे अध्यक्ष मुइज्जू यांच्या समर्थक सदस्यांनीही घोषणाबाजी करायला सुरवात केली. त्यांनी विरोधी पक्षांचे सदस्य यांची मागणी खोडून काढत मतदानाची मागणी लावून धरली. कॅबिनेट मंत्र्यांना मान्यता द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. काही क्षणातच त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

संसदेत रणसंग्राम सुरु झाला. दोन्हीकडील सदस्य एकमेकांना शिवीगाळ करत आमनेसामने आले. यात काही खासदारांनी तर विरोधी पक्षाच्या सदस्यांना उचलून जमिनीवर आपटले. लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक खासदार दुसऱ्याचा पाय ओढत असल्याचे दिसत आहे. संसदेत डोळ्यासमोर ही घटना घडत असताना अध्यक्ष मुइज्जू मात्र पहात राहिले होते.

का रोखले मतदान?

मुइज्जू मंत्रिमंडळामधील चार मंत्र्यांची मान्यता रोखणार असल्याचे परंतु विरोधी पक्षाने सांगितले होते. अध्यक्ष मुईज्जू यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये असा आक्षेप विरोधकांनी घेतळा होता. ज्या मंत्र्यांच्या विरोधात विरोधकांनी घेतला त्यामध्ये ॲटर्नी जनरल अहमद उशाम, गृहनिर्माण जमीन आणि नगरविकास मंत्री डॉ. अली हैदर, इस्लामिक व्यवहार मंत्री डॉ. मोहम्मद शाहीम अली सईद आणि आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांचा समावेश आहे.

तीन मंत्री याआधीच निलंबित

मालदीवच्या तीन मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याचे तिवस पडसाद भारतात उमटले होते. अखेर मालदीव सरकारने यांची गंभीर दखल घेत मंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महझूम मजीद यांना निलंबित केले होते.