Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Nana Patole resigns as Assembly Speaker)

BREAKING | नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 5:54 PM

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.  (Nana Patole resigns as Assembly Speaker)

नाना पटोले आज (4 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.

पटोलेंना कोणतं खातं मिळणार?

पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, ज्या काँग्रेस नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, त्याचं आताचं खातं पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्यालाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्याकडील आताचं खातं पटोले यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यामुळे मंत्रिपदाबाबतची खळखळ होणार नाही, अशा प्रकारची काँग्रेसची रणनीती असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

नवा विधानसभा अध्यक्ष कोण? 

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा अध्यक्ष, काँग्रेसचाच होणार की शिवसेनेचा? याबाबतही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Nana Patole resigns as Assembly Speaker)

नाना पटोले आणि राहुल गांधींची भेट 

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचल्याचे बोलले जात होतं.

महाराष्ट्रात मोठे संघटनात्मक बदल

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. राज्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांड आग्रही असल्याचे कळते. विद्यमान पाच कार्याध्यक्षांसह कार्याध्यक्षपदात वाढ करण्याची पक्षश्रेष्ठींची रणनीती आहे. संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याचे समजते.

नाना पटोलेंचे नाव का आघाडीवर?

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात येईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. (Nana Patole resigns as Assembly Speaker)

संबंधित बातम्या : 

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

नाना पटोले ‘सह्याद्री’वर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देणार?

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.