सिंधुदुर्ग : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत (Brigadier Sudhir Sawant) यांचा रविवारी काँग्रेस प्रवेश होणार आहे. मुंबईतील टिळकभवन येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत तीन वाजता पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा सुधीर सावंत (Brigadier Sudhir Sawant) यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेसमध्ये त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल असं बोललं जातंय.
सुधीर सावंत (Brigadier Sudhir Sawant) यांनी तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा दिवंगत प्रभा राव आणि प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. 2008 ला पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मायावतींच्या बहुजन समाज पक्षात प्रवेश करून महाराष्ट्रात काम केलं.
यानंतर आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद सांभाळून काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. एवढा सगळा राजकीय प्रवास करून ते पुन्हा एकदा स्वगृही प्रवेश करत आहेत. कोकणात त्यांना (Brigadier Sudhir Sawant) मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे कोकणात पक्षाला पुन्हा उभारी मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
कोण आहेत सुधीर सावंत?