BMC election 2022 Ward No 150 Rahul Nagar : वॉर्ड क्रमांक 150 मध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम कि भाजप नवी खेळी करणार? जाणून घ्या मतदारसंघाची सद्यस्थिती

| Updated on: Jun 08, 2022 | 6:01 AM

शिवसेनेला पालिकेच्या सत्तेतून दूर करण्यासाठी विरोधी बाकावरील भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालिकेच्या सर्वच वॉर्डमध्ये तगडा आणि प्रभावशाली उमेदवार उभा करून शिवसेनेचा पत्ता कट करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रमुख दोन पक्षांच्या राजकीय हालचाली लक्षवेधी ठरणार आहेत.

BMC election 2022 Ward No 150 Rahul Nagar : वॉर्ड क्रमांक 150 मध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम कि भाजप नवी खेळी करणार? जाणून घ्या मतदारसंघाची सद्यस्थिती
वॉर्ड क्रमांक 150 मध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम कि भाजप नवी खेळी करणार?
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शहर व उपनगरांतील सर्वच प्रभागांमध्ये राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली. त्या परिवर्तनाचे सावट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर यावेळची निवडणूक (Election) अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहेत. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच महापालिकेतही आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेला पालिकेच्या सत्तेतून दूर करण्यासाठी विरोधी बाकावरील भाजप (BJP)ने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालिकेच्या सर्वच वॉर्डमध्ये तगडा आणि प्रभावशाली उमेदवार उभा करून शिवसेनेचा पत्ता कट करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रमुख दोन पक्षांच्या राजकीय हालचाली लक्षवेधी ठरणार आहेत. वॉर्ड क्रमांक 150 ची निवडणूकही संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या संगीता चंद्रकांत हंडोरे (Sangeeta Chandrakant Handore) यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता. विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या मतांचा आकडा त्यांच्या जवळपासही पोहोचला नव्हता. या वॉर्ड क्रमांक 150 मध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम राहते कि भाजप काही नवी खेळी करतोय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मागच्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी

महापालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातून तब्बल 18 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या संगीता चंद्रकांत हंडोरे यांनी सर्वाधिक 8046 मते मिळवली होती. दुसऱ्या क्रमांकावरील कृष्णा माने यांना 2204 मते मिळाली होती. त्याव्यतिरिक्त अरुणा काकड (शिवसेना), विनोद बापू झगडे( महाराष्ट्र नवनिर्माण सेना), प्रभाकर आशाराम ढवळे (AIMIM), आठवले मयूर रामचंद्र (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), कृष्णा अण्णा माने (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), जितू बाबुराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रशांत महादेव शिवलकर (बहुजन समाज पक्ष), कुमार चिंतामणी थोरात (भारिप बहुजन महासंघ), विशाल शाम वाघमारे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), भुजलिंग भिवा सोनवणे (अपक्ष), सय्यद मोहिनुद्दीन मोईदीन (अपक्ष), अनिता किरण पटोले (अपक्ष), अशोक रामा पाटील (अपक्ष), न्यायनीत भास्कर पांडुरंग (अपक्ष), सुवर्ण संदिप जाधव (अपक्ष), स्नेहा संजय भालेराव (अपक्ष), बाबासाहेब ज्ञानू बनसोडे (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात उतरले होते.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

मतांची गोळाबेरीज

वॉर्ड क्रमांक 150 ची एकूण लोकसंख्या 50391 इतकी आहे. यात अनुसूचित जातीचे मतदार 7616 आणि अनुसूचित जमातीचे मतदार 335 इतके आहेत. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 18669 वैध मतांची नोंद झाली होती. या मतांनी रिंगणात उतरलेल्या 18 उमेदवारांचा फैसला केला होता. त्यात संगीता हंडोरे यांना विजयाची लॉटरी लागली होती. त्यावेळी 341 नोटा मते पडली होती.

हे सुद्धा वाचा

वॉर्डात प्रामुख्याने कोणत्या विभागांचा समावेश होतो?

पूर्व द्रुतगती महामार्गच्या जंक्शनपासून वॉर्ड क्रमांक 150 ची हद्द सुरु होते. या वॉर्डमध्ये राहुल नगर, बृहन्मुंबई महापालिका कॉलनी, ज्योती नगर, नवीन गरीब जनता नगरचा समावेश होतो. मागील निवडणुकीचे चित्र पाहता काँग्रेससाठी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे. काँग्रेसचा हा बालेकिल्ल्ला भेदण्याची धमक विरोधक दाखवतात का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.