BMC election 2022 Ward No 207 Byculla Railway Station : नायगाववर पुन्हा भाजप बाजी मारणार कि शिवसेना विजयश्री खेचून घेणार? जाणून घ्या या वॉर्डचे संपूर्ण चित्र

सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने विद्यमान शत्रू असलेल्या भाजपवर हिंदुत्वावरूनच टीकेची झोड सुरु ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या सर्वच प्रभागांतील उमेदवार निवडीबाबतही प्रमुख पक्षांची कसोटी लागणार आहे. वॉर्ड क्रमांक 207 मध्येही भाजप आणि शिवसेना नेमका कोणता उमेदवार देताहेत, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

BMC election 2022 Ward No 207 Byculla Railway Station : नायगाववर पुन्हा भाजप बाजी मारणार कि शिवसेना विजयश्री खेचून घेणार? जाणून घ्या या वॉर्डचे संपूर्ण चित्र
मुंबई महापालिका निवडणूक 2022Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 4:04 PM

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. प्रभाग निहाय आरक्षण (Reservation)ही जाहीर झाले आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष उमेदवार निश्चिती आणि मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहेत. मागच्या निवडणुकीत मराठी मतदार अर्थात स्थानिक भूमिपुत्रांचा प्रमुख मुद्दा घेऊन काही पक्षांनी निवडणूक (Election) लढवली. विशेष म्हणजे त्यावेळी ते मराठी कार्ड त्या-त्या पक्षांच्या पथ्यावरही पडले. यंदाच्या निवडणुकीत मराठी कार्डऐवजी हिंदुत्वा (Hindusm)च्या मुद्द्यावरून प्रमुख पक्षांमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने विद्यमान शत्रू असलेल्या भाजपवर हिंदुत्वावरूनच टीकेची झोड सुरु ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या सर्वच प्रभागांतील उमेदवार निवडीबाबतही प्रमुख पक्षांची कसोटी लागणार आहे. वॉर्ड क्रमांक 207 मध्येही भाजप आणि शिवसेना नेमका कोणता उमेदवार देताहेत, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

वॉर्ड क्रमांक 207 कुठून कुठेपर्यंत

मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड क्रमांक 207 म्हणजे नायगावचा वॉर्ड. नव्या प्रभाग रचनेनुसार या वॉर्डमध्ये नायगाव, शिंदेवाडी, दादर गुरुद्वारा, हिंदमाता, गौतमनगर, कोहिनूर मिल कंपाऊंड, कस्तुरबा हॉस्पिटल, भायखळा रेल्वे स्टेशन, डॉक्टर कंपाउंड या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. या वॉर्डच्या उत्तरेला वॉर्ड क्रमांक 203 (प्रशासकीय सीमा F/S वॉर्ड), पूर्वेला वॉर्ड क्रमांक 208 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग), दक्षिणेला वॉर्ड क्रमांक 210 आणि 211 (बापूराव जगताप मार्ग) तसेच पश्चिमेला वॉर्ड क्रमांक 212 (साने गुरुजी मार्ग)ची सीमा आहे.

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील चित्र

मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये महिला सर्वसाधारण प्रवर्गातून रिंगणात उतरलेल्या भाजपच्या सुरेखा रोहिदास लोखंडे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार आशा चव्हाण यांना पराभूत केले होते. त्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. महापालिकेत भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना हे दोन पक्ष निवडणुकीत वेगवेगळे लढले होते. त्यावेळी काँग्रेसतर्फे शुभांगी शिवाजी भुजबळ, मनसेतर्फे शलाका दिलीप हरियाण, राष्ट्रवादीतर्फे पेडणेकर सुरेखा आणि शिवसेनेतर्फे आशा वसंत चव्हाण आदी एकूण 11 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे मतविभागणी होऊन भाजपने बाजी मारली होती.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाआशा चव्हाण-
भाजपसुरेखा रोहिदास लोखंडेसुरेखा रोहिदास लोखंडे
राष्ट्रवादी काँग्रेससुरेखा पेडणेकर-
काँग्रेसशुभांगी शिवाजी भुजबळ-
मनसेशलाका दिलीप हरियाण-
अपक्ष / इतर--

वॉर्डची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या : 53848 अनुसूचीत जाती (SC) प्रवर्गातील लोकसंख्या : 5253 अनुसूचीत जमातीतील (ST) प्रवर्गातील लोकसंख्या : 337

यंदा शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेली जोरदार रस्सीखेच पाहता हा गड शाबूत राखण्यासाठी भाजपची कसोटी लागणार आहे, तर शिवसेनेला आपला भगवा फडकवण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागणार आहे. यात सरस कोण ठरतेय, याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.