BMC election 2022 Ward No 208 Jijamata Udyan : शिवसेनेपुढे भाजप, मनसेचे कडवे आव्हान; विजयासाठी सर्वच पक्ष तयारीला

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 प्रभाग होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 प्रभाग करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी मतांचे गणित बदललेले असून सर्वच वॉर्डमधील लढती रंगतदार होणार आहेत.

BMC election 2022 Ward No 208 Jijamata Udyan : शिवसेनेपुढे भाजप, मनसेचे कडवे आव्हान; विजयासाठी सर्वच पक्ष तयारीला
मुंबई महापालिका निवडणूक 2022Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 3:43 PM

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या यंदा होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) हे दोन पक्ष प्रमुख दावेदार असतील. याचवेळी ठाकरे घराण्यातील पुढच्या पिढीतील आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यातही लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप या दोन प्रमुख पक्षांबरोबरच मनसेची भूमिकाही तितकीच महत्वपूर्ण ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 208 मध्ये मागील निवडणुकीत शिवसेनेच्या रमाकांत सखाराम रहाटे यांनी बाजी मारली. त्यामुळे हा वॉर्ड शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. यंदाच्या निवडणुकीत हा गड शाबूत राखताना शिवसेनेपुढे भाजप आणि मनसे असे दुहेरी आव्हान (Challenge) असेल. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 प्रभाग होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 प्रभाग करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी मतांचे गणित बदललेले असून सर्वच वॉर्डमधील लढती रंगतदार होणार आहेत.

वॉर्ड क्रमांक 208 ची सीमा कोठून कुठेपर्यंत?

वॉर्ड क्रमांक 208 हा आकारमानाने मोठा असलेल्या वॉर्डपैकी एक वॉर्ड आहे. या वॉर्डची उत्तरेला वॉर्ड क्रमांक 204 आणि 205 (प्रशासकीय सीमा एफ/एस प्रभाग), पूर्वेकडे वॉर्ड क्रमांक 206 (क्वे स्ट्रीट), दक्षिणेला वॉर्ड क्रमांक 209 आणि 210 (रामशेठ नाईक मार्ग), पश्चिमेला वॉर्ड क्रमांक 207 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग) या वॉर्डची सीमा आहे. या वॉर्डमध्ये फेरबंदर, जिजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनारमाकांत सखाराम रहाटेरमाकांत सखाराम रहाटे
भाजपराकेश जेजुरकर-
राष्ट्रवादी काँग्रेससुशांत सुभाष शिंदे-
काँग्रेसप्रसाद घाडीगावकर-
मनसेकिरण शंकर टकले-
अपक्ष / इतरपंकज वसंत खरमाळे-

वॉर्ड क्रमांक 208 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या : 57121 अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील लोकसंख्या : 2152 अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लोकसंख्या : 347

हे सुद्धा वाचा

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमके काय चित्र होते?

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून शिवसेनेचे रमाकांत सखाराम रहाटे हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यावेळी एकूण 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात किरण शंकर टकले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), खान उमरसाद मोहम्मद (AIMIM), प्रसाद घाडीगावकर (काँग्रेस), राकेश जेजुरकर ( भारतीय जनता पार्टी), मोहम्मद. हमिफ खान (समाजवादी पक्ष), सुशांत सुभाष शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पंकज वसंत खरमाळे (संभाजी ब्रिगेड), शाह अकबर अली अब्दुल (भारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ), सुनील देवू यादव (बहुजन समाज पार्टी) मोहम्मद इंतेखाब मोहम्मद शमी खान (अपक्ष), मोहम्मद राफिक कलीमुल्ला खान (अपक्ष) यांचा समावेश होता. यंदा हा वॉर्ड ताब्यात घेण्याचा निर्धार केलेल्या भाजपने तगड्या उमेदवाराला रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. (Brihanmumbai municipal corporation elections mahanagar palika nivadnuk 2022 corporator ward no 208 election maharashtra news in marathi)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.