पंतप्रधान मोदी-ऋषी सुनक भेटीनंतर भारतीय तरूणांसाठी महत्वाची घोषणा, नोकरीची मोठी संधी
नरेंद्र मोदी-ऋषी सुनक भेटीनंतर मोठी घोषणा, पाहा...
मुंबई : इंडोनेशियातील बाली शहरात (Indonesia Bali) G20 शिखर परिषद (G20 Summit) पार पडतेय. यात अन्य देशांच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित आहेत. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची भेट झाली. मूळ भारतीय वंशाचे असणारे सुनक आणि मोदी (Narendra Modi) यांच्यात विविध मुद्द्यांवर बातचित झाली.
भारतीय तरूणांना ब्रिटनमध्ये येऊन नोकरी करण्याची इच्छा असते. या संदर्भातही या भेटीत चर्चा झाली. सुनक यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.
G20 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि मोदी यांचीही भेट झाली. भारत-अमेरिका मैत्रीचे संबंध या परिषदेदरम्यानही दिसून आहे.
ब्रिटनमध्ये जाऊन नोकरी करण्याची अनेक तरूणांची इच्छा असते. व्हिसा मिळणावण्यासाठी या तरूणांना प्रतिक्षा करावी लागते. त्यांच्यासाठी सुनक यांनी मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी भारतीय तरुणांना ब्रिटनमध्ये नोकरीसाठी व्हिसा मिळणार आहे. दरवर्षी तीन हजार तरूणांना नोकरीसाठी ब्रिटनचा व्हिसा मिळणार आहे, अशी घोषणा सुनक यांनी केली आहे.
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांचा जी20 परिषदेत सहभागी झाले आहेत. जी20 परिषदेत नरेंद्र मोदी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.