बसपाही मैदानात, राज्यातल्या सर्व जागा स्वबळावर लढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. तर काही उमेदवारांनी अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी आणि इतर काही पक्षांनी त्यांचे लोकसभेसाठीचे उमेदवार जाहीर केले. त्यातच आता बहुजन समाज पक्षानेही […]

बसपाही मैदानात, राज्यातल्या सर्व जागा स्वबळावर लढणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. तर काही उमेदवारांनी अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी आणि इतर काही पक्षांनी त्यांचे लोकसभेसाठीचे उमेदवार जाहीर केले. त्यातच आता बहुजन समाज पक्षानेही एक मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्ष राज्यात 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा बसपाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांनी केली.

कांशीराम यांच्या जयंती निमित्त कल्याणमध्ये आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बसपाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांनी “बहुजनांतून पंतप्रधान बनवायचे असेल तर राष्ट्रीय पक्षाला मतदान करा”, म्हणजेच मायावती यांना पंतप्रधान करायचे असेल तर बसपाला मतदान करा, असे आव्हान केले. बहुजन वंचित आघाडीला किती फायदा होणार या प्रश्नावर इंगळे यांनी सांगितले की, “बहुजन समाज पक्षाचा कॅडर आहे. त्यामुळे आम्हाला जास्त फायदा होईल”. हा कार्यक्रम राज्यातील बसपाची पहिली सभा असल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमात प्रदेश प्रधारी ना. तु. खंदारे, प्रदेश प्रभारी दयानंद किरदकर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

समाजवादी पक्ष सोडता इतर कोणत्याही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितलं होतं. त्यापार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही बसपा सर्वच्या सर्व 48 जागा लढवणार असल्याने इतर पक्षांची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. बसपाची विचारधारा मानणाऱ्या उमेदवारांला तिकीट दिलं जाणार आहे. येत्या 20 मार्चला बसपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत 8 ते 10 उमेदवारांचा समावेश असणार असल्याची माहिती बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

साहेब, मावळमधून आदित्य ठाकरेंना उमेदवारी द्या, शिवसैनिकाचं उद्धव ठाकरेंना पत्र

बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मुंडेंच्याच तालमीत तयार झालेला उमेदवार

सांगलीच्या जागेवरुन कदम आणि पाटील घराण्याचा वाद चव्हाट्यावर

वंचित बहुजन आघाडीकडून वर्ध्यात माजी एसीपी मैदानात

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.