Budget 2020 : बजेटच्या दिवशी निर्मला सीतारमण यांच्या पिवळ्या साडी परिधान करण्यामागे ‘अर्थ’ काय?
केंद्रातील मोदी सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी) सादर करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
Union Budget 2020 नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी) सादर करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. यावेळी निर्मला सीतारमण या पिवळ्या रंगाच्या साडीत दिसून आल्या. गेल्या वर्षी त्यांनी जेव्हा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा त्यांनी गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी किनार होती (Nirmala Sitharaman Yellow Saree).
यंदा पिवळ्या रंगाची साडी निवडण्यामागे अनेक खास कारणं असू शकतात. भारतीय परंपरा आणि हिंदू शास्त्रात पिवळ्या रंगाला शुभ मानलं गेलं आहे. त्याशिवाय, रंगांचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर पिवळा रंग हा समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक आहे (Nirmala Sitharaman Yellow Saree). त्यामुळे पिवळ्या रंगाच्या साडीत देशाचा लाल वही खाता सर्वांसाठी समृद्धी घेऊन येईल, म्हणून निर्मला सीतारमण यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली, असं म्हटलं जात आहे.
लेदर बॅगची परंपरा तोडली
निर्मला सीतारमण जेव्हा पारंपरिक चामड्याच्या बॅगमध्ये बजेट आणण्याची परंपराही तोडली. त्या लाल रंगाच्या कापडी पिशवीत गुंडाळलेली कागदपत्रं घेऊन संसदेत पोहचल्या. नरेंद्र मोदी सरकारमध्ये ‘सुटकेसची देवाणघेवाण’ होत नाही, हा संदेश देण्यासाठी अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बदलण्यात आली. लेदर सूटकेसची जागा लाल कापडी पिशवीने घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं.
निर्मला सीतारमण यांनी अशा अनेक परंपराना फाटा दिला आहे. जसे, त्या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. मोदी कॅबिनेटमध्ये त्या त्यांच्या नवीन विचारांसोबतच परंपरा जपणारी मंत्री म्हणून ओळखल्या जातात. हे त्यांच्य़ा पेहरावावरुन नेहमीच दिसून आलं आहे.
नवीन विचार आणि संस्कृतीची योग्य सांगड
निर्मला सीतारमण या नेहमीच साडीत नेसतात. त्यांच्या साड्यांचे रंगही भडक नसतात. त्या नेहमी डोऴ्यांना सुखावतील अशा रंगाच्या साड्या निवडतात. जसे, पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा इत्यादी. त्या हँडलूमच्या साड्या घालतात. अनेकदा त्या सूती साड्याही नेसतात. अर्थमंत्री या जास्त दागिनेही परिधान करत नाहीत. त्या सोन्याचा एक कडा, चैन आणि कानात छोटे कानातले घालतात.
निर्मला सीतारमण यांना आंध्र प्रदेशची पोचमपल्ली साडी फार आवडते. तसेच, त्यांच्याकडे जामदानी साड्याही आहेत. या साड्या बंगालमध्ये तयार होतात. कामाकाजावेळी निर्मला सीतारमण या कोटा डोरियाच्या सिल्क साड्या परिधात करतात.
Why Sitharaman choose to were Yellow Saree