बुलडाण्यातील गायकवाड-कुटे वादावर पडदा, सेना खासदार प्रतापराव जाधव यांनी खडेबोल सुनावले

शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार संजय कुटे यांच्‍यात पेटलेले युद्ध अखेर आज शमलेय. Sanjay Gaikwad and Sanjay Kute Conflict

बुलडाण्यातील गायकवाड-कुटे वादावर पडदा, सेना खासदार प्रतापराव जाधव यांनी खडेबोल सुनावले
संजय कुटे, संजय गायकवाड, प्रतापराव जाधव
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 7:14 PM

बुलडाणा: शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार संजय कुटे यांच्‍यात पेटलेले युद्ध अखेर आज शमलेय. सकाळी आमदार कुटे यांनी हा विषय आमच्‍यासाठी संपल्याचे फेसबुकच्या माध्यमातून जाहीर केले. तर, दुपारी खासदार प्रतापराव जाधव यांनीही शिवसेनेकडून हा विषय संपल्याचे जाहीर केलेय. ( Buldana MP Prataprao Jadhav said conflict between MLA Sanjay Gaikwad and Sanjay Kute stopped by Shivsena)

शब्द मोजून वापरा, खासदारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले

पुढील काळात अशा घटना घडू नये, कोणीही भावनेच्‍या आहारी जाऊ नये, सर्वांनी शब्‍द मोजून मापून वापरले पाहिजेत, असा सल्लाही खासदार प्रतापराव जाध यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. आपल्या कुणा जवळच्‍या व्‍यक्‍तीला, कार्यकर्त्याला बेड उपलब्‍ध होत नाही, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्‍ध होत नाही, इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाही, त्‍यामुळे त्रागा होतो. त्‍यातून अपशब्‍दही निघतो, मात्र त्‍याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. त्‍यामागील भावना समजून घेतल्या पाहिजेत, असा चिमटा विरोधकांना काढला आहे.

सध्या लढाईचे दिवस नाहीत

सध्या काही लढाई करण्याचे दिवस नाहीत. भांडण्याचे दिवस नाहीत. माझी सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यात शांतता राहिली पाहिजेत. आमच्‍यासाठी हा विषय आता संपलेला आहे. ज्‍याला कुणाला शक्‍ती प्रदर्शन करायचे असेल त्‍यांनी आपली शक्‍ती कोरोनाविरोधात लढण्यासाठी वापरावी. आपापल्या लोकांचे, कार्यकर्त्यांचे, नातेवाइकांचे जीव वाचविण्यात शक्‍ती खर्च करावी. शक्‍ती प्रदर्शन करण्याची गरज आताच्‍या काळात तरी नाही, असेही खासदार जाधव यांनी खडसावले. महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले असता यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

दोषींवर कारवाई करा

जिल्हाधिकारी यांना कोरोना संदर्भातील विविध मागण्याचे निवेदन महाविकास आघाडीने दिले. तर, पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाऊन भाजप- शिवसेना वादाच्या संदर्भात भेट घेऊन चर्चा केलीय. वादामध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीनं केलीय.

वादाला कधी सुरुवात?

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी केले होते. गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केलीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यानंतर बुलडाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला होता. यानंतर भाजपच्या माजी आमदारांना मारहाण झाली होती. शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार संजय कुटे यांनी परस्परांवर टीकास्त्र सोडलं होतं.

संबंधित बातम्या:

Video: आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी, सेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

VIDEO : मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते; शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली

( Buldana MP Prataprao Jadhav said conflict between MLA Sanjay Gaikwad and Sanjay Kute stopped by Shivsena)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.