उद्धव ठाकरेंना चॅलेंज? तुमच्यासाठी माझ्यासारखा शागिर्दच पुरे, खा. प्रताप जाधवांना कुणी दिलं प्रत्युत्तर?

मागील दोन्ही वेळेला तुम्ही मोदी लाटेवर निवडून आलात, अशी टीका प्रतापराव जाधव यांच्यावर करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंना चॅलेंज? तुमच्यासाठी माझ्यासारखा शागिर्दच पुरे, खा. प्रताप जाधवांना कुणी दिलं प्रत्युत्तर?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 9:00 AM

बुडढाणाः  तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, उद्धवजीच काय, माझ्यासारखा शागिर्दही तुमच्यासाठी पुरे. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना मिळालंय. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलंय. बुलढाण्यातून खासदारकीची निवडणूक लढवून दाखवा, असं चॅलेंज त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. त्यानंतर शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी जाधव यांना प्रत्युत्तर दिलं.

विदर्भ दौऱ्यावर असताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिखली येथे सभा घेतली होती. यावेळी त्यांनी शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव गद्दार म्हणत भाजपाच्या तिकिटावर लढणार नाही, हे जाहीर करा, असा टोला लगावला होता.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून प्रतापराव जाधव पहिल्यांदा आमदार झाले होते. 2009 मध्ये शिवसेनेनं त्यांना खासदारकीचं तिकिट दिलं होतं. त्यानंतर 2019 आणि आजपर्यंत त्यांना खासदारकी कायम ठेवली. मात्र शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना गद्दार संबोधला. त्यानंतर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांनाच चॅलेंज दिलं.

त्यानंतर सोमवारी एका ठिकाणी बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की शेतकरी पिकांची यादी वाचून दाखवावी.. शेतकरी रब्बीत आणि खरिपात कोणती पिक घेतो.. मगच त्यांनी मेळावा घ्यावा  आणि शेतकऱ्यांवर बोलावं..

बुलढाणा जिल्हा ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख यांनी खासदार जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय. आधी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, उद्धवजीच काय, माझ्या सारखा शागिर्दही तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही..

तुम्ही जनतेमधून निवडून आलाय आणि गद्दारी केली.. तर मागील दोनवेळा मोदी लाटेवर निवडून आले.. त्यामुळे अत्यंत अकार्यक्षम खासदार जिल्ह्याला मिळाले, अशी टीका ही त्यांनी केली.

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.