Kolhapur: बंटी विरुद्ध मुन्ना वाद पुन्हा शिगेला, गोकुळ दूधसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळच

माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळ संघावरील 35 वर्षांची एक हाती सत्ता उधळून लावत गेल्याच वर्षी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी दूध संघ काबीज केला. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे सर्वसाधारण सभेला सत्ताधारी गट सामोरा गेला. मात्र महाडिक गटानेही त्यात जोरदार प्रत्युत्तर देत शक्तिप्रदर्शन केले.

Kolhapur: बंटी विरुद्ध मुन्ना वाद पुन्हा शिगेला, गोकुळ दूधसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळच
गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ Image Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 5:51 PM

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk Sangh)वार्षिक सर्वसाधारण सभेतील (annual general meeting) गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली. अभूतपूर्व गोंधळात सत्ताधारी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने विषय पत्रिकेवरील विषय मंजूर करून घेतले, तर यानिमित्ताने महाडिक गटानेही जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सतेज पाटील विरुद्ध महाडिक हा सामना रंगतदार असणार याचीच झलक आज गोकुळच्या सभेनं (Chaos)दाखवून दिली आहे. यानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बंटी विरुद्ध मुन्ना सामना रंगणार असल्याचे स्पश्ट झाले आहे. सलग पराभवामुळे बॅकफूटवर गेलेला महाडिक गट ही आता आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

आजच्या सभेत नेमके काय घडले?

माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळ संघावरील 35 वर्षांची एक हाती सत्ता उधळून लावत गेल्याच वर्षी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी दूध संघ काबीज केला. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे सर्वसाधारण सभेला सत्ताधारी गट सामोरा गेला. मात्र महाडिक गटानेही त्यात जोरदार प्रत्युत्तर देत शक्तिप्रदर्शन केले. मुळात सभेच्या ठिकाणाबाबत आक्षेप घेणाऱ्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक या आपल्या समर्थकांसह सभेच्या ठिकाणी आल्या. शौमिका महाडिक सभागृहात जाताच त्यांच्या समर्थकांनी पोलीस बॅरिकेट तोडून आत प्रवेश मिळवला. त्यानंतर काही वेळातच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ देखील आले. ठरावधारक सभासदांना बसण्यासाठी जागा नसल्याचे सांगत संचालिका शौमिका महाडिक यांनी स्टेजसमोरच उभा राहण्याचा पवित्रा घेतला.

दीड तास सभा, समातंर सभा

अपेक्षेप्रमाणेच दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी आणि मंजूर-मंजूरच्या आरडाओरड अशा वातावरणातच गोकुळची आजची सभा पार पडली. फरक इतकाच गेली दोन-तीन वर्षे अवघ्या काही मिनिटात संपणार ही सभा आज मात्र दीड तास तरी चालली. दरम्यान विरोधी गटाच्या संचालिका शोमिका महाडिका सभा सुरू असताना समर्थकांसह बाहेर पडल्या आणि त्यांनी समांतर सभा घेतली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डोळ्यात डोळे घालून देण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नसल्याचा घणाघात महाडिक यांनी केला. महाडिक यांच्या आरोपाला सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले.

हे सुद्धा वाचा

सत्तांतरानंतरही महाडिक गट का आक्रमक?

लोकसभा, विधानसभा आणि गोकुळ दूध संघात झालेला पराभव त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत घ्यावी लागलेली माघार यामुळे महाडिक गट काहीसा बॅकफुटवर गेला होता. मात्र धनंजय महाडिक यांना दोनच महिन्यापूर्वी राज्यसभेवर मिळालेली संधी आणि त्यानंतर झालेल्या राज्यातील सत्तापरिवर्तन यामुळे जिल्ह्यातील महाडिक गटाला देखील आता चांगलेच बळ आले आहे. त्याचं प्रत्यंतर आजच्या गोकुळ सभेच्या निमित्ताने आले. त्यामुळे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये बंटी विरुद्ध मुन्ना हा सामना रंगतच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

का असते गोकुळच्या सर्वसाधारण सभेची चर्चा ?

कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक सत्ताकेंद्र अशी गोकुळ दूध संघाची ओळख आहे. राज्यभरात ही या संघाचा लौकिक आहे. त्यामुळे दररोज कोट्यावधीची उलाढाल या दूध संघाची सत्ता राजकीय दृष्ट्या देखील तितकीच च महत्वाची आहे. या दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभाही गेल्या चार ते पाच वर्षांपासून चर्चेत असते. मुन्ना महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील संघर्ष हे त्याचे मुख्य कारण आहे. या संघर्षामुळे 2018 आणि 2019 ला झालेल्या सभा अवघ्या काही मिनिटांत उरकाव्या लागल्या होत्या. इतकंच नाही तर या सभांमध्ये झालेला राडा देखील राज्याने पाहिला होता. मात्र सत्तांतरानंतरही सभेतील हा गोंधळ कायम असल्याचं आजच्या सभेच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...