By Election 2021 Result : 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी

| Updated on: Nov 02, 2021 | 10:44 PM

महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. त्यासाठी 30 नोव्हेंबरला मतदान तर 2 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण 15 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजेच चार जागांवर विजय मिळवला.

By Election 2021 Result : 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी
election
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. त्यासाठी 30 नोव्हेंबरला मतदान तर 2 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण 15 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजेच चार जागांवर विजय मिळवला. तर एकूण जागांपैकी काँग्रेसने आठ जागांवर आपला झेंडा रोवला.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी निवडणूक

या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण या निकालाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जनतेचा कौल जोखण्यास मदत होणार असल्याचे जाणाकार सांगतात. विधानसभेसोबतच लोकसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणूक झाली. यामध्ये दादरा आणि नगर हवेलीची जागा शिवसेनेने जिंकली. तर हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. मध्य प्रदेशातील खांडवा येथील जागेवर भाजपने आपला झेंडा फडकवला. विधानसभा पोटनिवडणुकीत आसाममधील 5, पश्चिम बंगालमधील 4, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमधील प्रत्येकी 3 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर बिहार, कर्नाटक आणि राजस्थान प्रत्येकी 2 जागांवर मतदान पार पडलं होतं. तर हरियाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली आहे.

आसाममधील विधानसभेच्या 5 जागांचे निकाल

गोसाईगाव- भाजपचा मित्रपक्ष यूपीपीएल (UPPL) विजयी
भबानीपूर- भाजपचा विजय
तामुलपूर- भाजपचा मित्रपक्ष यूपीपीएलचा (UPPL) विजय
मारियाणी – भाजपचा विजय
थोरा- भाजपचा विजय

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 4 जागांचे निकाल

दिनहाटा- तृणमूल काँग्रेस 1,64,089 मतांच्या फरकाने विजयी.
शांतीपूर- तृणमूल काँग्रेस 64,675 मतांनी विजयी.
खर्डा- तृणमूल काँग्रेसचा उमेदवार 93,832 मतांनी विजयी.
गोसाबा- तृणमूल काँग्रेसचा उमेदवार 1,43,051 मतांनी विजयी.

मध्य प्रदेशातील विधानसभेच्या तीन जागांचे निकाल

मध्य प्रदेशातील विधानसभेच्या तीन जागांचे निकाल
पृथ्वीपूर- भाजपचा 15600 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय
जोबात- भाजप 6 हजारांहून अधिक मतांनी विजयी.
रायगाव- काँग्रेस 12 हजार मतांनी विजयी.
हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या तीन जागांचे निकाल
फतेहपूर- काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय
जुब्बल-कोटखई- काँग्रेसचा विजय
अर्की – काँग्रेसचा विजय

मेघालयातील तीन विधानसभा जागांचे निकाल

माव्रेंगकेंग- एनपीपी (NPP) पक्षाचा 1816 मतांच्या फरकाने विजय. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर.
मावफ्लांग- UDP पक्षाचा उमेदवार 4401 मतांच्या फरकाने विजयी. काँग्रेस दुसऱ्या क्रंमावर, एनपीपी तिसऱ्या क्रमांकावर
राजबाला- एनपीपी (NPP) 1926 मतांनी विजयी. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, यूडीपी तिसऱ्या क्रमांकावर

बिहारमधील विधानसभेच्या 2 जागांचे निकाल

कुशेश्वरस्थान- JDU विजयी
तारापूर- JDU विजयी

कर्नाटकातील विधानसभेच्या 2 जागांचे निकाल

सिंदगी विधानसभा- भाजप 31,185 मतांनी विजयी
हंगल विधानसभा – काँग्रेसच्या उमेदवाराचा 7373 मतांनी विजयी

राजस्थानमधील विधानसभेच्या 2 जागांचे निकाल

वल्लभनगर- काँग्रेस 20400 मतांनी विजयी.
धारियावाड- काँग्रेस 18,725 मतांनी विजयी.

या राज्यात एका जागेसाठी पोटनिवडणूक

आंध्र प्रदेशची बडवेल जागा- YSRC विजयी

हरियाणातील एलेनाबाद जागा – INLD पक्षाचे चौटाला यांचा विजय

मिझोरामची तुइरिअल जागा – भाजपचा मित्रपक्ष मिझो नॅशनल फ्रंटचा विजय

तेलंगणाची हुजुराबाद जागा- भाजपचा विजय

महाराष्ट्रातील देगलूर विधानसभा मतदारसंघ- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

इतर बातम्या :

Degloor Biloli Bypoll Election 2021 | काँग्रेसने करुन दाखवलं, विजयानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

(by poll election in 13 state for 29 seats kon all winners name and all information)