‘मैं अटल हूँ’ करमुक्त करा, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अटलबिहारी वाजपेयींसारख्या भारतमातेच्या सच्च्या सुपूत्राचे दर्शन सर्व सामान्यांना घडावे. या थोर नेत्याच्या जीवनाचा समग्र वेध प्रत्येकाला घेता यावा यासाठी "मैं अटल हूँ" हा चित्रपट करमुक्त होणे आवश्यक आहे. यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा चित्रपट करमुक्त व्हावा अशी मागणी केली आहे.
मुंबई | 25 जानेवारी 2024 : देशाचे माजी पंतप्रधान कवी मनाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मैं अटल हूँ’ नुकताच मुंबईसह देशभर प्रदर्शित झाला आहे. भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तीमत्व लाभलेल्या थोर नेत्याच्या जीवनाचा प्रवास तरुण पिढीला पाहाता यावा यासाठी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवून केली आहे.
भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ’ चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तरुणांनी विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना पाहाता यावा यासाठी त्यास करमुक्त करण्यात यावे अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. या चित्रपटात हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेती पंकज त्रिपाटी यांनी अभिनय केलेला आहे. या चित्रपटात अणू चाचणी करुन भारताला सर्मथ राष्ट्रांच्या पंक्तीत बसविणारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक कांगोरे चित्रीत करण्यात आले आहेत. या चित्रपटाला जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्या कर मुक्त करण्यात यावे असे मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविल्या पत्राचा आशय आहे.
प्रत्येकाने चित्रपट पहावा
वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. स्व. अटलजी यांचे विचार सर्वदूर पोहचण्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक जनतेला पाहाता यावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना चित्रपट माफक दरात पाहता यावा याकरिता ‘मैं अटल हूँ’ महाराष्ट्रात करमुक्त व्हावा अशी आपली आग्रही मागणी असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रात म्हटले आहे. प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे. एका प्रतिभावंत नेत्याचा जीवनप्रवास सर्वांना मार्गदर्शक ठरेल असे कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.