‘पीयूष गोयल महाराष्ट्राचा अपमान करतायत, राज्यात तुम्हाला 5 लोकं तरी ओळखत असतील का?’

पीयूष गोयल हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले. | Piyush Goyal CM Uddhav Thackeray

'पीयूष गोयल महाराष्ट्राचा अपमान करतायत, राज्यात तुम्हाला 5 लोकं तरी ओळखत असतील का?'
पीयूष गोयल, केंद्रीय रेल्वेमंत्री
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 1:24 PM

कोल्हापूर: उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण करणे थांबवावे, अशी खरमरीत टीका करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्यावर महाविकास आघाडीकडून पलटवार करण्यात आला आहे. पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकं तरी ओळखतात का, असा खोचक सवाल महाविकासआघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी विचारला. (NCP leader Hasan Mushrif slams Piyush Goyal)

ते रविवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पीयषू गोयल आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. कोरोनाच्या मुद्द्यावरुन राजकारण होऊ नये, ही स्वत: उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका चुकीची आहे. पीयूष गोयल हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

तसेच भाजप संकटाच्या काळात राजकारण करत असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे घाणेरडं राजकारण करत आहेत. ते त्यांनी बंद करावं. भाजपने ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स आणि कोरोना लसींच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले आहे. महाविकासआघाडी सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी हे घाणेरडं राजकारण सुरु आहे. मात्र, आम्ही हात जोडून विनंती करतो की, संकटात राजकारण करु नये, असेही मुश्रीफ यांनी म्हटले.

पीयूष गोयल नेमंक काय म्हणाले होते?

ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरे यांनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झाले. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्याच्या घडीला आपण 110 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत आहोत. आतापर्यंत महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा, असे पीयूष गोयल यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

‘केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?’

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

‘राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाहीत, भाजपच्या नेत्यांवर गुन्हा करा’

(NCP leader Hasan Mushrif slams Piyush Goyal)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.