Pandharpur Mangalvedha by election | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उडी, ‘हा’ उमेदवार मैदानात
ढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहूजन आघाडीनेसुद्धा आपला उमेदावार जाहीर केला आहे. (pandharpur mangalvedha by election)
अकोला : राष्ट्रवादीचे नेते भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप तसेच माहाविकास आघाडीने महाविकास आघाडीनेसुद्धा आता वंचित बहूजन आघाडीनेसुद्धा आपला उमेदावार जाहीर केला आहे. वंचितकडून पंढपूर पोटनिवडणुकीसाठी विरप्पा मोटे (veerappa mote) यांच्या नावाची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakesh Ambedkar) यांनी केली. ही निवडणूक वंचित पूर्ण ताकदीने लढणार आहे. मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज 30 मार्च रोजी दाखल केला.
व्हीबीए पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनांतर पंढरपूर-मंगळवेढा येथील विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाने सविस्तर कार्यक्रम पत्रिकासुद्धा जाहीर केलीये. त्यानंतर ही जागा खिशात घालण्यासाठी राज्यातील मोठ्या पक्षांनी जोरदार तयारी केलीये. भाजपने समाधान आवताडे यांनी संधी दिली असून राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे येथील निवडणूक अतिशय अटितटीची होणार असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत आता वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा उडी घेतली आहे. वंचितकडून विरप्पा मोटे यांना तिकीट देण्यात आले असून त्यांच्या नावाची घोषणा घोषणा खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात केली. पंढरपूर येथील जागा वंचित पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचेही यावेळी वंचितने सांगितले. मोटे यांनी काल ( 30 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना महिला जिल्हाप्रमुखाची बंडखोरी
तत्पूर्वी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Pandharpur Assembly By-Election) जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे (Shaila Godse) यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलेलाय. यावेळी बोलताना बंडखोरी करुन अर्ज भरल्यामुळे शिवसेना पक्षाने कारवाई केली तरी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचे गोडसे यांना सांगितले.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक
> 17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!
> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
> मतदान – 17 एप्रिल 2021
> निवडणूक निकाल – 2 मे 2021
इतर बातम्या :
SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार
LIVE | वंचित बहुजन आघाडीची पंढपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उडी, ‘हा’ उमेदवार मैदानात