शरद पवार यांच्या भेटीनंतर कप्तान मलिक यांची नवाब मलिकांच्या जामिनावर प्रतिक्रिया म्हणाले…
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी नवाब मलिक यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना लवकरच जामीन मिळेल असा विश्वास नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक (Captain Malik) यांनी व्यक्त केला आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यांना लवकरच जामीन मिळेल असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे. दिवाळीनिमित्त कप्तान मलिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट बारामतीमध्ये जाऊन घेतली. या भेटीनंतर कप्तान मलिक यांनी नवाब मलीक यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मलिक
नवाब मलिक यांना जामीन कधी मिळणार यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांना लवकरच जामीन मिळेल असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. न्यायपालिकेत जेव्हा ताऱीख असते तेव्हा आमच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित असतात. आज ना उद्या त्यांना नक्की जामीन मिळेल असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांची घेतली भेट
दरम्यान नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी दिवाळीनिमित्त बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि साहेबांचे अर्शीवाद घेण्यासाठी बारामती आलो होतो. मलिक यांच्या जामिनाबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जेव्हा जेव्हा न्यायपालिकेत तारीख असते, तेव्हा तेव्हा आमच्या कुटुंबातील व्यक्ती न्यायालयात उपस्थित असतात. मलिक यांना आज ना उद्या नक्की जामीन मिळेल असं या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे.