Special Report : आनंद परांजपे यांच्यावर गुन्हा, आतापर्यंत महाविकास आघाडीचे या तीन नेत्यांविरोधात गुन्हे दाखल

आपण कोणाबद्दल बोलतोय कशाबद्दल बोलतोय कशी भाषा वापरतोय याचेही भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.

Special Report : आनंद परांजपे यांच्यावर गुन्हा, आतापर्यंत महाविकास आघाडीचे या तीन नेत्यांविरोधात गुन्हे दाखल
आनंद परांजपे
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 11:26 PM

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष आता आणखी तीव्र झालाय. कारण एकनाथ शिंदे यांविरोधात घोषणा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. घोषणाबाजीवरुन आनंद परांजपे यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्य़ात आलाय.

आनंद परांजपे म्हणाले, माझ्यावर दाखल केलेले सर्व गुन्हे सूडबुद्धीने लावलेले आहेत. सरकार आणि विरोधक असा लढा नेहमीच होत असतो त्यासाठी अश्या प्रकारचे राजकारण करून गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. आम्ही जे आंदोलन केलं आहे त्यामध्ये कोणताही असंसदीय शब्दाचा वापर केलेला घोषणा दिलेल्या नव्हत्या. धर्मामध्ये तेढ निर्माण होईल किंवा कोणाशी बदनामी होईल अशा पद्धतीचे शब्द या घोषणांमध्ये नव्हते. तरीही सराईत गुन्हेगार असल्याप्रमाणे आमच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, भान ठेवलं तर लोकांच्या भावनेचा उद्रेक होणार नाही. लोकांच्या भावना आहेत त्या त्या ठिकाणी जावून व्यक्त केल्या आहेत. आपण जेव्हा काही म्हणतो त्या गोष्टी विचारपूर्वक बोलल्या पाहिजेत. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण काही बोलू शकतो. पण आपण कोणाबद्दल बोलतोय कशाबद्दल बोलतोय कसे भाषा वापरतोय याचेही भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.

ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांवर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आणि आता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी आनंद परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाण्यात शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते यांच्यात राजकीय संघर्ष सुरु झालाय. एकमेकांवर टीका, एकमेकांविरोधात आंदोलन, एकमेकांविरोधात घोषणाबाजी आणि आता गुन्हेही दाखल होऊ लागले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.