Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नगरसेवकावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना नगरसेवकावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा
Follow us
| Updated on: Dec 26, 2019 | 7:34 AM

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड (Shivsena corporator Mahesh Gaikwad) यांच्यावर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, महेश गायकवाड यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढेच नाही, तर महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) हे त्यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

कल्याण पूर्वचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रभागात एका खाजगी कंपनीचे खोदकाम करून केबल टाकण्याचे काम सूर आहे. बुधवारी (25 डिसेंबर) हे काम सुरु असताना महेश गायकवाड यांचे समर्थक याठिकाणी पोहचले आणि खोदकाम करणाऱ्या कामगारांना मारहाण केली. महेश गायकवाड यांनी 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी  महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

महेश गायकवाड यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड हे त्यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या आरोपानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘गुन्हेगार काही पण बोलतो आहे. खंडणी मागणे हे चुकीचे आहे’, अस गणपत गायकवाड यांनी म्हटलं. या प्रकरणानंतर सेना आणि भाजपमधील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.