Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमावबंदी आदेश झुगारल्याचा फटका, गिरीश महाजनांसह 11 जणांवर गुन्हा, काय कारवाई होणार?

Girish Mahajan : आधीही जळगावात मोर्चा काढल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. फक्त गिरीश महाजनच नव्हे तर त्यांच्यासह तब्बल 125 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जमावबंदी आदेश झुगारल्याचा फटका, गिरीश महाजनांसह 11 जणांवर गुन्हा, काय कारवाई होणार?
गिरीश महाजन, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 6:57 AM

जळगाव : जळगावातील जामनेरमध्ये (Jamner, Jalgaon) भाजपनं गुरुवारी मोर्चा काढला होता. मात्र या मोर्च्याच्या आयोजनामुळे गिरीश महाजनांसह (Girish Mahajan) अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गिरीश महाजन यांच्या 11 जणांविरोधात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे नेते, तालुकाध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख यांच्यासह एकूण 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता गिरीश महाजन यांच्यासह 11 कार्यकर्त्यांवर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच दिला होता. ओमिक्रॉनमुळे (Omicron) राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णसंख्येची वाढ ही चिंताजनक ठरु लागल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत होतं. त्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ही जमावबंदी झुगारत मोर्चा काढण्यानं गिरीश महाजनांसह 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याआधीही दाखल झालाय गुन्हा!

दरम्यान, आधीही जळगावात मोर्चा काढल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. फक्त गिरीश महाजनच नव्हे तर त्यांच्यासह तब्बल 125 जणांविरोधात जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमावबंदीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन केलं होतं. त्यामुळे तेव्हाही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कशासाठी होता मोर्चा?

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी नियमित वीज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्यानं सरकारचा निषेध करण्यासाठी गिरीश महाजन आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांची एक बैठकही बोलवण्यात आली होती. या बैठकीचीही जळगावात चांगलीच चर्चा रंगली होती. जामनेर इथल्या पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हजर राहिलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रम आटोपल्यावर गिरीश महाजन यांच्या घरी हजेरी लावली होती. या भेटीनंही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच दुसरीकडे आता गिरीश महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचं पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गुन्हादेखील दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या :

Eknath Khadse : रोहिणी खडसेंचा पराभव छुप्या युतीमुळंच, गिरीश महाजन यांनी भाजप विकली, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर

जळगावमध्ये पुन्हा खडसे विरुद्ध महाजन, खडसे म्हणातात महाजनांनी भाजप विकली…तर महाजन म्हणतात…

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर – गिरीश महाजन

ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.