कंगनाच्या मदतीला केंद्र सरकार, Y+ दर्जाची सुरक्षा, कंगनाकडून अमित शाहांचे आभार
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतच्या मदतीला केंद्र सरकार धावून आलंय (Y+ grade security to Kangana Ranaut).
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतच्या मदतीला केंद्र सरकार धावून आलंय (Y+ grade security to Kangana Ranaut). केंद्र सरकारने कंगना रनौतला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रनौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.
मुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.
हेही वाचा : महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक
ये प्रमाण है की अब किसी देशभक्त आवाज़ को कोई फ़ासीवादी नहीं कुचल सकेगा,मैं @AmitShah जी की आभारी हूँ वो चाहते तो हालातों के चलते मुझे कुछ दिन बाद मुंबई जाने की सलाह देते मगर उन्होंने भारत की एक बेटी के वचनों का मान रखा, हमारे स्वाभिमान और आत्मसम्मान की लाज रखी, जय हिंद ? https://t.co/VSbZMG66LT
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 7, 2020
हेही वाचा : मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, कंगनाचा एल्गार, थोबाड फोडणार, शिवसेनेचा पलटवार
केंद्राकडून सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, “आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.”
हेही वाचा : पोलिसांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित, कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : अनिल देशमुख
Bollywood actor Kangana Ranaut given Y+ category security by central agencies: officials
— Press Trust of India (@PTI_News) September 7, 2020
दरम्यान, मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतविषयी सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. याआधी कंगनाने “मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दात ट्विटरवरुन आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता.
गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांसोबत केली जाते, पण काही जण मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना मुंबईत राहायचा हक्क नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.
काय आहे प्रकरण ?
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.
मुंबई पोलिसांशी हुज्जत
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते. (Kangana Ranaut decides to visit Mumbai Shivsena answers)
“बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.
संबंधित बातम्या :
Kangana Ranaut | हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती
कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता… : राखी सावंत
Y+ grade security to Kangana Ranaut