Ramdas Athawale | रामदास आठवले कोरोनामुक्त, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
मी पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे, असेही रामदास आठवले म्हणाले. (Minister Ramdas Athawale successfully Recovered from Corona)
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवले कोरोनामुक्त झाल्याचं कळताच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराजवळ शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. (Minister Ramdas Athawale successfully Recovered from Corona)
रामदास आठवले यांना गेल्या 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. अखेर त्यांची ही चाचणी कोरोना निगेटिव्ह आली आहे. मी पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे समजल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. रामदास आठवले उपचार घेत असलेल्या रुग्णालयापासून ते घरापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना कोरोनामुक्तीसह दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नोयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) October 27, 2020
रामदास आठवले यांना 12 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती ही उत्तम होती. पण खबरदारीचा उपाय म्हणून 4 दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन आठवले यांनी केलं होतं. (Minister Ramdas Athawale successfully Recovered from Corona)
दरम्यान, रामदास आठवले कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या संविधान या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
#WATCH Mumbai: RPI workers celebrate outside Union Minister Ramdas Athawale’s residence after he returned home from a private hospital post his #COVID19 recovery.
He had tested positive for Corona on October 27. pic.twitter.com/yNbwmbNBx7
— ANI (@ANI) November 8, 2020
संबंधित बातम्या :
देवेंद्र फडणवीस, अजितदादा, तटकरेंनंतर राज्यातील अजून एका बड्या नेत्याला कोरोनाचा संसर्ग