राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही, छगन भुजबळ यांचा घणाघात

राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, असे छगन भुजबळ म्हणाले. (Chagan Bhujbal governor Bhagat Singh Koshyari)

राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही, छगन भुजबळ यांचा घणाघात
छगन भुजबळ आणि भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 2:26 PM

नाशिक : “गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झालंय. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे. एका हाताने टाळी वाजत नाही,” अशा शब्दात अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कानऊघडणी केली. ते नाशिकमध्ये ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Chagan Bhujbal criticizes governor Bhagat Singh Koshyari on airplane permission)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 11 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होतं.आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं होतं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. या प्रकरानंतर महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका झाली. याच टीकेला प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले.

एका हाताने टाळी वाजत नाही

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील तणाव वाढत चालला आहे. एकमेकांचा मान सन्मान राखण गरजेचं आहे. राज्यपालांचा जसा मान आहे. तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. टाळी एक हाताने वाजत नाही. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहिजे. मंत्रिमंडळाने दिलेल्या 12 विधानपरिषदेच्या आमदारांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेलना नाही,” असे भुजबळ म्हणाले. तसेच राज्यपाल आणि CMO या दोघांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी राजकारण करू नये

यावेळी बोलताना त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले “ मी 1985 पासून विधानमंडळात आहे. मात्र, असे कधीही घडलेलं मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यानी नाव पाठवल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमदारांच्या नावावर सही व्हायची. अटलजींच्या, शिवसेनेच्या काळातदेखील असंच होतं. 1995 साली काँग्रेसप्रणित राज्यपाल होते. त्यावेळी अचानक सरकार बदललं. मात्र तरी सुद्धा राज्यपालांनी तत्काळ त्यावर सही केली. त्यामुळे राज्यात कोण जास्त राजकारण खेळतंय हे पाहणं गरजेचं आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी राजकारण करू नये असा शिरस्ता आहे.”

दरम्यान, राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असे राज्य शासनाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरले!

Special Report | राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष वाढणार?

(Chagan Bhujbal criticizes governor Bhagat Singh Koshyari on airplane permission)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.