काँग्रेस कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरेंच्या भीमशक्ती संघटनेत पक्षप्रवेशाचा धडाका

नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हंडोरेंच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. (Chandrakant Handore Bhimshakti Nanded)

काँग्रेस कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरेंच्या भीमशक्ती संघटनेत पक्षप्रवेशाचा धडाका
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 10:05 AM

नांदेड : काँग्रेसचे माजी मंत्री आणि कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी भीमशक्ती संघटनेत प्रवेश केला. आंबेडकरी चळवळीतील कुमार कुरतडीकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भीमशक्ती या सामाजिक संघटनेत प्रवेश केला. (Chandrakant Handore Bhimshakti Organisation Nanded)

उपेक्षितांच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आपली संघटना काम करेल असा विश्वास या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केला. कुमार कुरतडीकर यांच्या प्रवेशाने नांदेडमध्ये आता भीमशक्ती संघटनेची ताकद वाढणार आहे, असंही हंडोरे म्हणाले. यापूर्वी वंचित आघाडीत कुरतडीकर यांनी भरीव कामगिरी केली होती.

कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?

चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात काम पाहिले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हंडोरेंच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली.

काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप चंद्रकांत हंडोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे हंडोरे काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली होती.

स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा

नाशिकमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ‘भीमशक्ती’च्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांकडून काँग्रेस सोडण्यावर भर दिला जात होता. आगामी काळात भीमशक्ती संघटना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचंही चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं होतं. भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात होतं.

विधानसभेला पराभव, विधानपरिषदेचं तिकीटही नाही

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले होते, मात्र शिवेसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. त्यातच विधानपरिषदेवरही वर्णी न लागल्याने हंडोरे नाराज असल्याची माहिती होती.

संबंधित बातम्या :

विधानसभेला पराभव, विधानपरिषदही नाही, काँग्रेसचे माजी मंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत

ना विधानसभा, ना परिषद, काँग्रेस सोडण्याचा इशारा दिलेल्या माजी मंत्र्याला कार्यकारी अध्यक्षपद

(Chandrakant Handore Bhimshakti Organisation Nanded)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.