“तो फोटो आताचा नव्हेच! जुना फोटो दाखवून दिशाभूल केली जातेय”, नितेश राणे, अमेय खोपकरांच्या आरोपांना चंद्रकांत खैरेंचं उत्तर

द्रकांत खैरे पैसे वाटत असल्याचा दावा करण्यात आलाय. यावर स्वत: शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो फोटो जुना आहे. जुना फोटो शेअर करत आरोप लावणं चुकीचं आहे, असं खैरे म्हणालेत.

तो फोटो आताचा नव्हेच! जुना फोटो दाखवून दिशाभूल केली जातेय, नितेश राणे, अमेय खोपकरांच्या आरोपांना चंद्रकांत खैरेंचं उत्तर
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 3:31 PM

मुंबई : कालच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विराट सभेत पैसे देऊन लोकांना आणल्याचा आरोप भाजप आणि मनसेच्या वतीने करण्यात आला. अमेय खोपकर आणि नितेश राणे यांनी एक फोटो शेअर केला. यात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पैसे वाटत असल्याचा दावा करण्यात आलाय. यावर स्वत: शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो फोटो जुना आहे. जुना फोटो शेअर करत आरोप लावणं चुकीचं आहे, असं खैरे म्हणालेत.

खैरे काय म्हणाले?

पैसे वाटपाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर चंद्रकांत खैरे यांनी आपली बाजू मांडली आहे. “तो फोटो जुना आहे. अनेकदा मंदिरांसाठी मी देणगी देत असतो. तसंच मागे कधीतरी मी देणगी देत असतानाचा हा फोटो असावा. पण जुना फोटो शेअर करत आरोप ते खोटे आहेत. आता माझे केस पांढरे आहेत. या फोटोतील केस काळे आहेत. मी काल सकाळी कोणत्या कपड्यांमध्ये होतो, संध्याकाळी कोणत्या कपड्यांमध्ये होतो हे माध्यमांनी दाखवलं आहे. हा कालचा फोटो नाही,” असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

“अमेय खोपकर आणि नितेश राणेंच्या वडिलांसोबत मी काम केलंय. या नवीन मुलांना राजकारण कळत नाही”, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

नितेश राणेंची पोस्ट

भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. यात चंद्रकांत खैरेंचं नाव न घेता त्यांनी केवळ शिवसेनेच्या विराट सभेचा फॉर्मुला असं सूचक वक्तव्य केलं आहे. या फोटोत चंद्रकांत खैरे लोकांना पैसे देत असताना दिसतात. काल उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्यानंतर आज नितेश राणेंनी ही पोस्ट केली आहे.

अमेय खोपकरांचं ट्विट

तर मनसे नेते अमेय खोपकरांनीही हाच फोटो उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दिवशी म्हणजे 08 जून रोजी रात्री ट्विट केलाय. त्यात त्यांनी थेट चंद्रकांत खैरेंचं नाव घेत आरोप केला. त्यांनी लिहिलंय ‘ चंदू खैरे सभे आधी पैसे वाटताना.. चंदू खैरेंचा ‘आक्रोश’- सभेसाठी या रे…’

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.