सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरे ‘छोटा पप्पू’; चंद्रकांत खैरे म्हणाले, हा तर हिरवा साप, आता रंग…

सत्तार यांनी अधिकाऱ्याला दारू पिता का? असं विचारलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर त्याला मी साहेब म्हणत नाही. तो कुणालाही काही म्हणतो.

सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरे 'छोटा पप्पू'; चंद्रकांत खैरे म्हणाले, हा तर हिरवा साप, आता रंग...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 1:29 PM

औरंगाबाद: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांचा छोटा पप्पू असा उल्लेख केला आहे. सत्तार यांच्या या विधानामुळे शिवसेना प्रचंड संतापली आहे. ठाकरे गटातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर सत्तार यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. अब्दुल सत्तार हा हिरवा सापच आहे. तो हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहे, तो आधी हिरवा साप होता. आता सरडा झाला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

सत्तार भाजपमध्ये आले. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेण्यास विरोध केला. मेळावा घेऊन विरोध केला. तुम्ही आमच्याकडे त्याला ढकललं. त्याबदल्यात आम्हाला एक जागा एक्स्ट्रा दिली. उद्धव ठाकरेंनी त्यांना स्वीकारलं. निवडूनही आणलं. एवढं झाल्यावर भाजपचे कार्यकर्ते म्हणतात तो हिरवा साप आहे. म्हटलं हो. आता ही त्याला सिल्लोडमध्ये जाऊन हिरवा सापच म्हणेल. तो सापच नाही तर रंग बदलणारा सरडा आहे. माझ्या या विधानाशी मुस्लिम बांधवही सहमत आहेत. कारण सत्तार यांनी मुस्लिमांची जमीन हडप केली आहे, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मी चिडलेलो आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही ठाकरे घराण्याला काही बोलत असतील तर आम्ही कसे ऐकून घेणार? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगणार नाही. शिंदेच्या हातात काही नाही. त्यांचं फक्त याच्या घरी जा, त्याच्या घरी जा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे जुने मित्र आहेत. त्यांना सांगेल यांना काढून टाका. त्यांचा राजीनामा घ्या. फडणवीस यांना सवाल आहे. तुम्ही हे का सहन करता? तुम्हाला ही बेशिस्त आवडते का? तुमचे मंत्री असे असतील तर तुमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. अशा मंत्र्यांना किक आऊट करा, अशी मागणी त्यांनी केली.

आता आम्ही शिवरायांसमोर शपथ घेतली. सत्तारला गाडणार. त्याला येऊच देणार नाही. मुसलमानांच्या जमिनी हडपल्या. माझ्याकडे कागदपत्रं आहेत. त्यांनी शाळेतील लोकांची खोटी कामे केली आहेत, असा दावाही त्यांनी केला.

सत्तार यांनी अधिकाऱ्याला दारू पिता का? असं विचारलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर त्याला मी साहेब म्हणत नाही. तो कुणालाही काही म्हणतो. तो कलेक्टरला दारू पिता का? असं विचारत असेल तर कलेक्टर शांत का बसला? तो कुणाच्या दबावा खाली होता? धनंजय मुंडेंनी कलेक्टर शर्माला इथे आणलं होतं. सत्तार यांचं हे वागणं तुम्हाला हे आवडतं का? असा सवाल मी आयएएस लॉबीला करेल, असं ते म्हणाले.

आपल्या कलेक्टर बाबत असं म्हणत असेल हा माणूस तर तुम्ही सहन का करता? हा माणूस कोणत्याही मिटिंगमध्ये काहीही म्हणतो. त्यांना जाब का विचारत नाही? असा सवाल करतानाच शेतकऱ्यांवर संकट आहे. हे म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करणार नाही. जणू काही यांच्या हातातच तिजोरी आहे. शेतकऱ्यांना त्यांनी हिणवलं. शेतकरी अडचणीत आहेत. चिडलेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.