Chandrakant Khaire | ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, आम्हाला शहाणपण शिकवते का? चंद्रकांत खैरे भडकले

तू ठाकरे है तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं.. असा इशारा देत मी हनुमान चालिसाची भक्ती सुरूच ठेवली, असं वर्णन नवनीत राणांनी एका कार्यक्रमात केलं.

Chandrakant Khaire | ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, आम्हाला शहाणपण शिकवते का? चंद्रकांत खैरे भडकले
नवनीत राणा, चंद्रकांत खैरे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 2:48 PM

औरंगाबादः नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून राणांवर जोरदार टीका होतेय. औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) तर नवनीत राणांना (Navneet Rana) चांगलंच सुनावलंय. जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हाला हनुमान चालिसाचं महत्त्व सांगणार? ती आम्हाला शहाणपण शिकवते का? असं वक्तव्य खैरे यांनी केलंय. औरंगाबादमध्ये खैरेंनी टीव्ही9 च्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यावरही जहरी टीका केली. अमित शहा राक्षसी वृत्तीने काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

नवनीत राणांवर काय टीका?

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंविषयी एका सार्वजनिक कार्यक्रमात वक्तव्य केलं. यावरून शिवसेना नेत्यांमध्ये संताप आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिती, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात…. ती बाई आम्हाला हनुमान चालिसा शिकवती, आम्हाला शहाणपणा शिकवती? तिच्याविषयी आमच्याकडे बोलूच नका… असं वक्तव्य खैरेंनी केलं.

‘तोंड सांभाळून बोलावं’

तर नवनीत राणा यांनी जरा तोंड सांभाळून बोलावं, असा इशसारा मुंबईतल्या शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिलाय. ही मुंबईची मुलगी त्यावेळी सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. तिला मातोश्रीचा, बाळासाहेब ठाकेरंचा इतिहास काय माहिती? आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवत आहे, हे महाराष्ट्राला पक्कं कळलंय… अशी जहरी टीका घाडी यांनी केली आहे.

तू ठाकरे है, तो मै राणा हूँ

जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी हनुमान चालिसासाठी कसं आंदोलन केलं, याचं वर्णन केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रावरील संकटासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणण्याची विनंती केली. पण त्यांनी मान्य केली नाही. उलट मलाच इशारा दिला. ज्या पायांनी मुंबईत याल, त्यावर परत जाणार नाहीत म्हणाले… यावर तू ठाकरे है तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं.. असा इशारा देत मी हनुमान चालिसाची भक्ती सुरूच ठेवली, असं वर्णन राणांनी केलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकल्यानंतरही मी 12-12 तास हनुमान चालिसा म्हटलं, त्यामुळे आज त्यांच्या दारात कार्यकर्तेही उभे राहत नाहीत, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.