‘मुश्रीफांसाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केलाय. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यासाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी आहे,त असा टोला लगावलाय.

'मुश्रीफांसाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी', चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 7:26 PM

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्यांच्या या आरोपानंतर आता राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केलाय. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यासाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी आहे,त असा टोला लगावलाय. (BJP President Chandrakant Patil answer to Rural Development Minister Hasan Mushrif)

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा समोर आणला. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ते माझे मित्र आहेत. माझं नाव हे त्यांच्यासाठी झोपेची गोळी आहे. मित्राला माझं नाव घेतल्यावर चांगली झोप लागत असेल तर हरकत नाही. ते 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्या ऐवजी त्यांनी 500 कोटींचा दावा दाखल करावा. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते, त्यासाठी व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवालही पाटील यांनी केलाय.

धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मी आणलेला प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केलाय. 19 महिने तुम्ही काय झोपले होता का? कोरोना काळात पैसा गोळा करण्यात व्यस्त होतात का? असे खोचक सवालही पाटील यांनी मुश्रीफांना विचारले आहेत.

हायब्रीड अॅन्यूईटी प्रकल्पाबाबत पाटलांचा दावा

हॅब्रीड अॅन्यूईटी मध्ये 30 हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष 60 टक्के आणि 40 टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही, असंही पाटील यांनी म्हटलंय.

किरीट सोमय्यांचे आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला.

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

इतर बातम्या :

सोमय्यांनी मुश्रीफांविरोधात बत्ती लावली, उद्या ईडीकडे तक्रार नोंदवणार तर परवा केंद्रात तीन ठिकाणी पुरावे देणार

किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप, हसन मुश्रीफांचा चंद्रकांत दादा आणि समरजीत घाटगेंना इशारा

BJP President Chandrakant Patil answer to Rural Development Minister Hasan Mushrif

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.