चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, मंगलप्रभात लोढा मुंबई अध्यक्षपदी!

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषण केली.

चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, मंगलप्रभात लोढा मुंबई अध्यक्षपदी!
Follow us
| Updated on: Jul 16, 2019 | 4:06 PM

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषण केली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळतील.

भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवेंकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आहेत.  तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्रीपद सोपवण्यात आलं. त्यामुळे शेलार यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद देण्यात आलं.

दरम्यान रावसाहेब दानवेंनी पंतप्रधान मोदींना भेटून महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

पक्षात एक व्यक्ती एक पद याअंतर्गत मला अध्यक्षपदापासून मुक्त करावं, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली. तसंच येत्या काळात नवा पूर्णवेळ अध्यक्ष लवकर नेमावा असंही मी मोदींना सांगितलं, अशी माहिती दानवेंनी दिली.

रावसाहेब दानवे यांचा 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता पुन्हा दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

चंद्रकांत पाटील नवे प्रदेशाध्यक्ष

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं.  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनाच पसंती होती. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.

कोण आहेत चंद्रकांत पाटील?

  • कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर गावाचे रहिवाशी
  • वडील गिरणी कामगार असल्याने दादांचे बालपण मुंबईतल्या चाळीत गेलं
  • मुंबईत असताना शालेय वयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक वाढली
  • दादांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच पक्षात जोमानं काम केलं
  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाते
  • पुणे पदवीधर मतदार संघातून दोन वेळा विधानपरिषदेवर विजयी
  • 2014 साली राज्यात सरकार आल्यानंतर दादांवर महत्वाची जबाबदारी सोपवली
  • शिवसेना- भाजप एकत्र आणण्यात दादांनी महत्वाची भूमिका बजावली
  • संघटनात्मक बांधणी करण्यात चंद्रकांत पाटील यांचा हातखंडा
  • मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान यशस्वी तोडगा काढण्यात यश
  • लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळवलं
  • चंद्रकांत पाटील हे सलग 13 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत
  • 2008 मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले
  • 2004 पासून ते महाराष्ट्रातील राजकारणात सक्रीय आहेत.
  • 2004 मध्ये महाराष्ट्र युनिटचे महासचिव
  • 2014 पासून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री
  • सहकार, विपणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख
  • जुलै 2016 मध्ये चंद्रकांत पाटलांनी महसूल मदत आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून पदभार स्वीकारला
  • 16 जुलै 2019 रोजी चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली.

चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी एका मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून 1985 साली त्यांनी पदवी प्राप्त केली.

कोण आहेत मंगलप्रभात लोढा? 

  • मंगल प्रभात लोढा हे मुंबईतील उच्चभ्रू मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत
  • मुंबईतील सर्वात मोठा लोढा ग्रुपचे ते संस्थापक आहेत.
  • मंगल प्रभात लोढा हे स्वांतत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायमूर्ती गुमान माल लोढा यांचे सुपुत्र आहेत.
  • त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी जैन कुटुंबात झाला.
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं.
  • 1995 पासून सलग पाच वेळा मलबार हिल या उच्चभ्रू मतदारसंघातून ते निवडून येत आहेत.
  • देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर्सपैकी एक म्हणून मंगलप्रभात लोढा ओळखले जातात

संबंधित बातम्या 

लोकसभा निवडणुकीपासून घरी गेलो नाही, बायको थेट दिल्लीला आली : दानवे  

स्पेशल रिपोर्ट : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी?  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.