नुकसान भरपाई घरात बसून द्यायची नसते, त्यासाठी बांधावर जावे लागते- चंद्रकांत पाटील

सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. | Chandrakant Patil

नुकसान भरपाई घरात बसून द्यायची नसते, त्यासाठी बांधावर जावे लागते- चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 3:16 PM

सांगली: नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावे लागते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत. आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागाण्यांसाठी आंदोलने करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. (Chandrakant Patil Criticised CM Uddhav Thackeray)

तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही पाटील यांनी केला. विरोधक आक्रमक झाले तर आपली आमदारकी धोक्यात येईल, अशी भीती सत्ताधारी पक्षातील काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळे हे आमदार स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर सरकारमधून बाहेर पडण्याासाठी दबाव आणत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘विधानपरिषद मिळणार असल्याने राजू शेट्टी शांत झालेत’ एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेचे वेध लागल्याने ते शांत बसले आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्य सरकरने मदतीबाबत केंद्राकडे मागणी केली का? राज्य सरकारने कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का?, असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले.

उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर विरोधकांची जोरदार टीका उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार हे अनुक्रमे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी अगोदरच बाहेर पडले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याची कार्यपद्धती विरोधकांच्या टीकेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थितीची शून्य जाण; आजवरचा सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री: राणे

(Chandrakant Patil Criticised CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.