पनवेल : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरुन महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. ते पनवेलमधील शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. त्यांनी आज (26 मार्च) उरण, पनवेल आणि खारघर याठिकाणी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतल्या (Chandrakant Patil criticize MVA government and Uddhav Thackeray over crime against women).
चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकतेच मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.”
या सरकारचे भीषण स्वरूप भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवले पाहिजे, असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तर ‘न घर का न घाट का’, असं म्हणत टोला लगावला.
RCF दीपाली चव्हाण ची आत्महत्या नाही तर हत्या आहे
DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा
राज्यात महिलांना जाळलं जातयं बलात्कार सामुहीक बलात्कार होताहेत आत्महत्येला भाग पाडल जातयं आणि @Maha_MahilaAyog ला अजूनही अध्यक्ष नाही ही बाब लाजीरवाणी pic.twitter.com/c4ZK3emB0p
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 26, 2021
या बैठकीला माजी खासदार ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनंद पटवर्धन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश सोनी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. पण हे सरकार बेभान होऊन केवळ आपले गुन्हे आणि भ्रष्टाचार लपविण्यामागे व्यस्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जरा डोळे उघडून हा आलेख बघा म्हणजे तुम्हाला राज्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाची जाणीव होईल.”
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. पण हे सरकार बेभान होऊन केवळ आपले गुन्हे आणि भ्रष्टाचार लपविण्यामागे व्यस्त आहे. मुख्यमंत्री @OfficeofUT आणि आरोग्यमंत्री @rajeshtope11 जरा डोळे उघडून हा आलेख बघा म्हणजे तुम्हाला राज्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाची जाणीव होईल. pic.twitter.com/9Cg6oTbVg5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 26, 2021
“राज्य सरकारच्या बेफिकर कारभाराची शिक्षा जनतेला देणे चूक आहे. तुम्ही व्यवस्थापनात कमी पडलात म्हणून पुन्हा लॉकडाऊन लावून जनतेला वेठीस धरू नका. लॉकडाऊन लावायचा असल्यास जनतेच्या उदरनिर्वाहाची समस्या राज्य सरकारने प्रथम सोडवावी,”
हेही वाचा :
वडील गिरणी कामगार, चाळीत बालपण गेलं; चंद्रकांतदादांविषयी हे माहीत आहे का?
मग परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टातील याचिका खोटी आहे का?; चंद्रकांतदादांचा वर्मावर घाव
‘राठोडांचा राजीनामा, वाझे निलंबित; पण अनिल देशमुखांना वाचवलं; उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवतायत’
व्हिडीओ पाहा :
Chandrakant Patil criticize MVA government and Uddhav Thackeray over crime against women