‘मंत्रिमंडळाला नैतिक अधिकार उरला नाही, उद्धवजी… आता तरी सरकार बरखास्त करा’, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

निल देशमुखांचे सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळेच ते चौकशीसाठी हजर झाले, असं मी कालच बोललो होतो. सर्व सामान्य माणूस सापडत नसेल तर सर्च वॉरंट निघालं असतं. काहीजण जात्यात आहेत तर काहीजण सुपात आहे, असा सूचक इशाराच पाटील यांनी दिलाय.

'मंत्रिमंडळाला नैतिक अधिकार उरला नाही, उद्धवजी... आता तरी सरकार बरखास्त करा', चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 2:24 PM

कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकरून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये वाक् युद्ध सुरु आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. (Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray after action against Anil Deshmukh and Ajit Pawar)

अनिल देशमुखांचे सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळेच ते चौकशीसाठी हजर झाले, असं मी कालच बोललो होतो. सर्व सामान्य माणूस सापडत नसेल तर सर्च वॉरंट निघालं असतं. काहीजण जात्यात आहेत तर काहीजण सुपात आहे, असा सूचक इशाराच पाटील यांनी दिलाय. अजित पवार यांची 12 कोटींची मालमत्ती सील करण्यात आली आहे. एकामागे एक रांग लागली आहे. मंत्रिमंडळाला आता नैतिक अधिकार उरलेला नाही. उद्धवजी… आता तरी सरकार बरखास्त करा. नैतिकता असेल तर राजीनामा द्या. पुन्हा एकदा निवडणूक होऊन जाऊद्या, असं आव्हानच पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

संजय राऊतांना आव्हान

पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही खोचक टोला लगावलाय. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. त्यावरुन बघा बघा… कशाला काही असेल तर आताच कारवाई करा. गृहमंत्री आताही तुमचाच आहे, अशा शब्दात पाटील यांनी राऊतांना आव्हान दिलं आहे.

चुकीला माफी नाही!

अनिल देशमुखांच्या अटकेच्या कारवाईबाबतही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. ‘कुणाचाही कार्यकर्ता असु दे. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी 2014 ला सांगितलं होतं. देशातून राज्या-राज्यांतून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचंय. देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झालं. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिला. आता ईडीने अटकेची कारवाई केलीय. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही’.

अनिल देशमुखांवर अटकेची कारवाई

अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर रात्री 12 पर्यंत त्यांची चौकशी झाली. म्हणजेच 13 तास मॅरेथॉन चौकशी झाली. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

इतर बातम्या :

‘अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, अजित पवारांनी चौकशीला सामोरं जावं’, रामदास आठवलेंचा सल्ला

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?

Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray after action against Anil Deshmukh and Ajit Pawar

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.