शरद पवारांसारखं आयतं राज्यसभेत जात नाही किंवा माघारही घेत नाही : चंद्रकांत दादा

बारामती : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी भाजपाच्या 19 सदस्यांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्षपद घेतलं. त्यानंतर दर महिन्याला मुंबईला जाऊन त्यांनी वाटेल तेवढा निधी घेऊन आले. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपण माढातून लढायला तयार असल्याचं सांगून दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशा माणसाला गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? असा उद्विग्न सवाल महसूलमंत्री […]

शरद पवारांसारखं आयतं राज्यसभेत जात नाही किंवा माघारही घेत नाही : चंद्रकांत दादा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

बारामती : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी भाजपाच्या 19 सदस्यांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्षपद घेतलं. त्यानंतर दर महिन्याला मुंबईला जाऊन त्यांनी वाटेल तेवढा निधी घेऊन आले. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपण माढातून लढायला तयार असल्याचं सांगून दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशा माणसाला गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? असा उद्विग्न सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपची संस्कृती लोकांना आवडते, त्यांना प्रेम मिळतं म्हणून ते आमच्या पक्षात प्रवेश करतात, असंही त्यांनी भाजपच्या इनकमिंगवर बोलताना सांगितलं. दुसरीकडे आपण 5 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. शरद पवार यांच्यासारखं आयतं राज्यसभेत जात नाही किंवा माढ्यातून माघारही घेत नाही, अशा शब्दात शरद पवार यांच्यावर टीका केली.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत नागरिकांच्याही भेटी घेतल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. अनेकजण जेलमध्ये जाण्याऐवजी भाजपमध्ये जातात, याबद्दल विचारलं असता त्यांनी भाजपची संस्कृती लोकांना आवडत असल्याचं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी काँग्रेस नेते प्रतिक पाटील यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित करत वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी सुरु असताना एकाही काँग्रेस कार्यालयात त्यांची जयंती साजरी झाली नसल्याचंही नमूद केलं.

मागील लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक न लढवताही खासदार सुप्रिया सुळे यांची दमछाक केली होती. आता तर आम्ही कमळ चिन्हावर उमेदवार दिलाय. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कमालीमुळे भाजपची मतदार संख्या वाढली आहे. त्याच जोरावर आम्ही बारामतीचीही जागा जिंकू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना धनगर आणि धनगड एक आहेत हे म्हणण्याचा अधिकार शासनाला नाही. त्यामुळे आम्ही धनगड महाराष्ट्रात नाहीत असं प्रतिज्ञापत्र दिल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात नाही, त्यामुळे आम्ही धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणेच सुविधा देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्या राष्ट्रवादीत असलेले खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अनेक संस्थांकडून लोकांची देणी मिळत नाहीत याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी भाजप हा चुकीच्या लोकांना माफी देत नाही.. मात्र त्यांच्या अडचणीत मदत करतो.. आम्ही त्यांना एफआरपी किंवा अन्य बाबींबाबत मदतच करु, असं सांगतानाच हवं तर तुम्हीही या, आम्ही तुम्हाला मदत करु असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

याचवेळी शरद पवारांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी, आपण 5 जिल्हे, 58 विधानसभा, 10 लोकसभा आणि 6 लाख मतदार संख्या असलेल्या मतदारसंघात निवडणूक लढवली आहे. 2008 साली झालेल्या निवडणुकीवेळी आपण तब्बल एक लाख किमी प्रवास केला. शरद पवारांसारखं राज्यसभेत जाऊन बसत नाही किंवा माढ्यातून माघारही घेत नाही, अशी बोचरी टीका केली.

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.