आडवंच करायचं असेल तर बोलायचं कशाला?, जे आहे ते करुन टाकावं; भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान

शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्रिपदावरच्या माणसाची असू शकत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil Uddhav Thackeray)

आडवंच करायचं असेल तर बोलायचं कशाला?, जे आहे ते करुन टाकावं; भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 5:07 PM

सोलापूर :”शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्रिपदावरच्या माणसाची असू शकत नाही. आडवे करायचं असेल, तिडवे करायचे असेल तर बोलायचे कशाला ? जे आहे ते करून टाकावं,” असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले. (Chandrakant Patil criticizes Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना मुलाखत दली. ही मुलाखत शुक्रवारी (27 नोन्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीत ‘कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.’ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी केले. यावर बोलताना चंद्रकातं पाटलांनी वरील भाष्य केले. ते सोलापूरमध्ये ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

“शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरसुद्धा उद्धव ठाकरे यांचं असंच भाषण झालं. शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसाची असू शकत नाही. त्यांना जर अशीच भाषा वापरायची असेल तर, सर्वसामान्य लोकांनासुद्धा जे सुरु आहे; ते बरोबर नाही हे समजत आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

गरजेल तो पडेल काय?

यावेळी, चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलेल्या भाष्यावरुन उद्धव यांना लक्ष्य केलं. त्यांनी, आडवं करायचं असेल, तिडवे करायेच असेल तर बोलायचे कशाला?जे आहे ते करुन टाकावं, असे म्हणत गरजेल ते पडेल काय अशी खोचक टीका केली.

मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. या मुलाखतीचा प्रोमो नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. यात राज्यातील कोरोना स्थिती, भाजपाकडून होणारी टीका, सरकारसमोरील आव्हान याबाबतची भाष्य करण्यात आलं आहे. ही मुलाखत शुक्रवारी (27 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. यावेळी, विरोधकांना उद्देशून “विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. पण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती मिळते. कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

रोहित पवारांना बळ, पार्थ पवारांना डावललं, पवार कुटुंबात सारं काही अलबेल नाही?; ‘या’ पुस्तकातील खळबळजनक दावे

EXCLUSIVE : फडणवीस म्हणाले, तुमच्यासोबत कोण, दादा म्हणाले धनंजय मुंडे, सुनील शेळके, संदीप क्षीरसागरसह 28 जण!

सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले, परदेशात मालमत्ता घेतल्या; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

(Chandrakant Patil criticizes Uddhav Thackeray)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.