‘ती’ भेट टाळता आली असती, केंद्रीय भाजप नेत्यांचे चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष निर्देश?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांनी जोर धरला.

'ती' भेट टाळता आली असती, केंद्रीय भाजप नेत्यांचे चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष निर्देश?
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे भेट- संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 11:06 AM

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांनी जोर धरला. मात्र दिल्ली दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या बड्या नेत्यांची याबाबत कुठेच वाच्यता झाली नसल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटील – राज ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय भाजप नेत्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. इतकंच नाही तर सध्या ही भेट टाळता आली असती अशी केंद्रीय भाजप नेत्यांची धारणा असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे केंद्रीय भाजपकडून मनसेसाठी रेड ॲलर्टच असल्याचं चित्र आहे. संबंधित भेट ही फक्त प्रदेश भाजपचीच होती, असं म्हणत केंद्रीय भाजपकडून राज ठाकरेंची मनसे वेटिंग लिस्टवरच असल्याचं दिसतंय.

इतकंच नाही तर केंद्रीय भाजप नेत्यांच्या भेटीत राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा तर दूरच, पण एकदाही साधा उल्लेखही झालेला नाही.

अमित शाह-चंद्रकांत पाटील यांची भेट नाहीच 

चंद्रकांत पाटील हे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र दिल्लीत ही भेट झालीच नाही. केवळ देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचीच भेट झाल्याची माहिती आहे.

भाजपचे बडे नेते दिल्लीत

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते दिल्लीत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे अशी भाजपची फौज दिल्लीत आहे. पक्ष संघटनाबाबतच्या चर्चांसह नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठी भाजप नेते घेत आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या या भेटीगाठी राज्याचं लक्ष लागलं आहे.

चंद्रकांत पाटील-राज ठाकरे भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेटी होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी सांगितलं.

VIDEO : अमित शाह-चंद्रकांत पाटील भेट नाहीच!

संबंधित बातम्या  

राज ठाकरे माझ्या घरी चहाला आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल : चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.