बारामतीत पवारांची कोंडी केल्याची पावती, पुण्याचं पालकत्व चंद्रकांत पाटलांकडे?

पुणे : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलंय. विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात शतप्रतिशत कमळ फुलवायचंय. यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या जागेवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देऊन पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देता येणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र […]

बारामतीत पवारांची कोंडी केल्याची पावती, पुण्याचं पालकत्व चंद्रकांत पाटलांकडे?
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 9:00 PM

पुणे : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलंय. विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात शतप्रतिशत कमळ फुलवायचंय. यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या जागेवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देऊन पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देता येणार आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिलंय. त्यामुळे आतापासून रणनीती तयार करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट हे संसदेत गेल्यामुळे आता पुण्याच्या पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पुन्हा पवार कुटुंबीयांची कोंडी करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आखलेल्या रणनीतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चांगलीच दमछाक झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत करण्याचं नियोजन भाजपने केलंय.

पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रकांत पाटील यांच्या निवडीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एका दगडात अनेक पक्षी मारता येणार आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.