BJP : “देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीन”, चंद्रकांत पाटील म्हणतात राज्यात काय चाललंय याची माहिती नाही, भाजप का भूमिका झटकतंय?

Devendra Fadnvis : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याविषयी विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं.

BJP : देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीन, चंद्रकांत पाटील म्हणतात राज्यात काय चाललंय याची माहिती नाही, भाजप का भूमिका झटकतंय?
फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा, चंद्रकांत पाटलांचं विधान
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:09 AM

मुंबई : सध्या राज्यात राजकीय सत्ता समीकरणं बदलत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट भाजपसोबत जाण्याची दाट शक्यता आहे. अश्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला गेले आहेत. ते मोदी-शाह जे. पी. नड्डा यांच्याशी याचविषयावर चर्चा करणासाठी दिल्लीला गेले असल्याचं बोललं जातंय. त्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. ते मोदी-शाह जे. पी. नड्डा यांच्याशी याचविषयावर चर्चा करणासाठी दिल्लीला गेले असल्याचं बोललं जातंय. त्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं. देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीनचा भाग आहे. ते नेहमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी जात असतात. आताही ते त्याचसाठी गेले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांचा दिल्ली दौरा

मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अश्यात देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. ते काल(गुरुवार) दिल्लीत गेले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी ते विविध मुद्द्यावर चर्चा करत आहेत. पण त्याचं हे दिल्लीला जाणं रुटीनचा भाग असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलंय. “राज्यामध्ये जे चाललं आहे त्याच्याशी भाजपचा काहीही संबध नाही.चाललेल्या घटनांशी भाजपचा काही संबध नसल्याने कोण आलं कोण गेलं हे पत्रकारांच्या माध्यमातून कळत आहे. मोहित कंभोज हे सगळ्यांचेच मित्र आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले असतील मोहित तू ये… मै एकेला हुँ! मोहित कंभोज हे जगनमित्र आहेत ते गेले असतील”, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.