दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील

दोन-अडीच तास एकत्र असतील, तर चहा-बिस्किटावर तर चर्चा झाली नसणार ना. पण ही बैठक अनिर्णायक होती, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 12:09 PM

मुंबई : दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे दोन बडे नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्चा होणे साहजिकच आहे, असं सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी केलं. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला उत्तर देताना ‘राजकारणावर चर्चा करणे गुन्हा आहे का?’ असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी विचारला. (Chandrakant Patil on Sanjay Raut Devendra Fadnavis meeting)

दोन वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्चा होतेच. ते दोन-अडीच तास एकत्र असतील, तर चहा-बिस्किटावर तर चर्चा झाली नसणार ना. पण ही बैठक अनिर्णायक होती, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“निवडणूक लढवणे कोणत्याही पक्षासाठी, उमेदवारासाठी कठीण असतं. कुठल्याही पक्षाला मध्यावधी निवडणुका नको असतात. कोणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. पण आगामी काळात निवडणूक भाजप सगळ्याच निवडणुका स्वबळावर लढवेल.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“शिवसेनेला भूमिकाच नसते. त्यांना फक्त कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी भूमिका असते. शिवसेनेकडे फक्त एकच भूमिका आहे, ती म्हणजे खुर्चीची” असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

‘पक्षाचे प्रदेश प्रमुख म्हणून मी हे स्पष्ट करु इच्छितो की शिवसेना, राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसला सरकार स्थापण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहोत. त्यामुळे आम्ही तिघांसोबत सरकार बनवू शकत नाही, पण ते तिघे एकत्र राहू शकत नाहीत’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

(Chandrakant Patil on Sanjay Raut Devendra Fadnavis meeting)

“मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील, तर राजभवनमध्ये जाऊन सांगावे लागेल” असे उत्तर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर दिले. “राजकीय विषयावर बातचित करणे गुन्हा आहे का? दोन राजकीय नेते भेटले की देशावर चर्चा होते, कृषी विधेयकावर होते, जम्मू काश्मीरवर गप्पा रंगतात, चीनच्या विषयावर बातचित होते” असे राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या 

फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत

फडणवीसांना भेटणं अपराध आहे का?, राऊतांचा सवाल

अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

(Chandrakant Patil on Sanjay Raut Devendra Fadnavis meeting)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.