Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrakant Patil | ‘शरद पवारांच्या कामाचा वेग भयंकर’, चंद्रकांत पाटलांकडून पवारांचं गुणगान

पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व देशाने पाहिलं आहे. आम्ही त्यांचा आदर ठेऊनच टीका करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil | 'शरद पवारांच्या कामाचा वेग भयंकर', चंद्रकांत पाटलांकडून पवारांचं गुणगान
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 8:17 PM

पुणे : कोकण दौऱ्यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil Praised Sharad Pawar) शरद पवारांवर आरोप केले होते. यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मात्र, आज पुण्यात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचं गुणगान केलं. “सरकारला सध्या पवार साहेब मार्गदर्शन करतात, असं दिसत नाही. पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व देशाने पाहिलं आहे. आम्ही त्यांचा आदर ठेऊनच टीका करतो. या वयात कोकणात जाऊन त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. या वयातही ते तब्येतीची काळजी न करता समस्येला झडप मारतात”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचं (Chandrakant Patil Praised Sharad Pawar) कौतुक केलं.

मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली. कोकणात अजित पवार, जयंत पाटील गेले नाही. मुख्यमंत्री केवळ एक ते दीड तास गेल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

पुण्यात भाजपा नगरसेवक धीरज घाटेंनी वादळग्रस्त शेतकऱ्यांना घरांचं साहित्य पाठवलं. या वाहनांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सरकारनं पक्की घरं बांधून देता येतील का याबाबत विचार करावा : चंद्रकांत पाटील

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी चक्रीवादळानं शेतकरी, मच्छिमाराचा मोठं नुकसान झालं. त्यामुळे प्रति झाडाला किमान पाच वर्षाच्या उत्पन्नानुसार पैसे दिले पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली. त्याचबरोबर सरकारनं पक्की घरं बांधून देता येतील का याबाबत विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

याप्रकरणी आमचा राजकारणाचा काहीच सबंध नाही. मात्र, ते ‘सामना’तून रोज ठोकायला मोकळे. त्यांना जणू काय मोकळीक आहे. कोकणात जाऊन विचारा एक रुपया तरी खाली पोहोचला का, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला.

तर सरकार गोंधळल्याने अपयशी ठरत आहे. कोणताच निर्णय होत नाही. महाविद्यालयांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा निर्णय, उद्योगधंद्यांचा निर्णय होत नाही. सरकारचा दृढनिश्चय नसल्याने सरकार अपयशी ठरत आहे. सरकार लेचापेचा असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

सरकारने केंद्राच्या वेगवेगळ्या एजन्सी बोलावून मागणी केली पाहिजे. त्यानंतर केंद्र मदत करेल. मात्र, सरकार स्वतःच्या खिशात हात घालेल की नाही, असा प्रश्न पडत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

Chandrakant Patil Praised Sharad Pawar

सरकार चालवणार्‍यांना कायदा प्रशासन काहीच कळत नाही : चंद्रकांत पाटील

अजोय मेहता यांच्या प्रकरणी बोलताना इतके वर्षे राज्य करुन यांना प्रशासनाचा ज्ञानच नाही. कोरोनामुळे तीन वर्ष एक्स्टेन्शन मिळाल्याने पुन्हा त्यांना एक्स्टेन्शन मिळत नाही. मेहतांना सेकंड एक्स्टेन्शन मिळणार नसल्याचा दावा केला. सरकार चालवणार्‍यांना कायदा प्रशासन काहीच कळत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

तर भाजपच्या वतीने आतापर्यंत 10 हजार सोलर कंदील दिले आहेत. आणखी 10 हजार सोलर कंदील देणार आहोत. त्याचबरोबर अहमदाबादची कंपनी प्रत्येक गावात सोलर पोल उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कोकणात आता गुजरातच्या कंपनीचे सोलर दिवे लागणार आहेत. त्याचबरोबर एक लाख नारळ आणि सुपारीची रोप देणार आहोत. वर्षभर खतं ही दिलं जाणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

Chandrakant Patil Praised Sharad Pawar

संबंधित बातम्या :

‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त

पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर ‘कोरोना सेस’ आकारा : बाळा नांदगावकर

Balasaheb Thorat | तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात नाही, पण सरकारे पाडण्यासाठी निधी वेळेत : सामना

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.