चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला 20 जागा, आता जयंत पाटील म्हणतात..

जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वतंत्र निवडणुकीबाबतच्या वक्तव्यावर पलटवार केला. Jayant Patil slams Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला 20 जागा, आता जयंत पाटील म्हणतात..
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 1:27 PM

पंढरपूरः जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज पंढरपूरमध्ये आहेत. पक्षाच्या बैठकीसाठी त्यांनी पंढरपूर दौरा केला. यावेळी ते हेलिकॉप्टरने पंढरपुरात पोहोचले. मात्र सध्या लॉकडाऊन आणि अनलॉकिंग सुरु असताना, हेलिकॉप्टरबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणून आलो असं उत्तर दिलं. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला. (Jayant Patil slams Chandrakant Patil)

भाजपवर पलटवार “भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना 60-65 जागावरच समाधान मानावे लागेल”, असं जयंत पाटील म्हणाले. नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढून, आपली ताकद दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. “भाजपनेही स्वतंत्र लढावं, त्यांना केवळ 60 ते 65 जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत”, असं जयंत पाटील म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यावेळी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या वीज बिल वाढीविरोधातील आंदोलनाबाबत विचारण्यात आलं. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वीज बिलाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल”

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. शरद पवारांच्या सामनातील मुलाखतीवरुन चंद्रकांत पाटील यांनी हे भाष्य केलं. यावेळी त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ असं आव्हानही पवारांना दिलं.

MahaFast News 100 | पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

(Jayant Patil slams Chandrakant Patil)

संबंधित बातम्या 

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या : चंद्रकांत पाटील 

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.