Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार : चंद्रकांत पाटील

"राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत. Chandrakant Patil on Shiv sena BJP alliance

राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 12:10 PM

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढे केला आहे. “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil says BJP is ready to form government with Shivsena)

शिवसेनेला उपरती झाली, तर येतील, आम्ही काही प्रयत्न करणार नाही. भाजपने हात पुढे केला असे काही अर्थ काढू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची काल पहिली बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्यासाठी तयारी करा, असे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. मात्र चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता आहेत.

वाचा :  शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील

“जर-तर अशी हवेतली चर्चा सुरु आहे. केंद्रीय नेतृत्वाची जर चर्चा झाली, तर जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी वर्षभरात लालूंची साथ सोडली, तसं शिवसेनेला वाटलं, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून, त्याबाबत चर्चा होऊ शकते. पण या जर-तरच्या गोष्टी आहेत”

“आम्ही आज विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवून, मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेतला. जर एकत्र यायची वेळ आली, तरी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढणार नाही. निवडणुका झाल्यानंतर दोघांची मेजॉरिटी झाली नाही, तर एकत्र येऊ शकतात. शिवसेनेने निवडणुका एकत्र लढवून पळ काढला”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपची काल बैठक झाली. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुद्दा मांडला, स्वबळावर सरकार आलं पाहिजे. समजा 4 वर्षे निवडणुकांसाठी लागतील. पण जर शिवसेनेला नितीश कुमारांप्रमाणे वाटलं, तर राज्याच्या हितासाठी एकत्र येऊ, मात्र निवडणुका आम्ही स्वतंत्रच लढू. याचा अर्थ आम्ही आता शिवसेनेकडे हात पुढे केलाय असं नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.  (Chandrakant Patil says BJP is ready to form government with Shivsena)

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितले आहे, इतके कणखर व्हा, की यापुढे कुठलीही निवडणूक एकट्याने लढवता आली पाहिजे. आताही शिवसेनेला सरकार करायचं झालं तर आम्ही एकत्र येऊ. जर उद्धवजीना वाटले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना बाजूला करु, तर ते केंद्रीय नेतृत्वाला सांगतील” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या 

Chandrakant Patil | अजित पवार हेडमास्तर, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं : चंद्रकांत पाटील