पिंपरी चिंचवड : “प्रत्येकाची एक कार्यपद्धती असते, तशी अजितदादांची आहे. पण तुमचा धाक आहे ना, तो आठवड्यातून एकदा येऊन होणार नाही. रोज येऊन बसायला लागेल” असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. अजित पवारांनी कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे प्रकार समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. काम होत असेल तर तिथल्या तिथे सोक्ष-मोक्ष, पण काम होणार नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगणे अशी अजित पवारांची ख्याती आहे. (Chandrakant Patil Suggests Ajit Pawar to visit Pune Pimpari daily)
“सकाळी 7 ते 1 मुंबईत काम करायचं, 1 ते 3 प्रवास, 3 ते 5 पिंपरीत, 5 ते 9 पुण्यात” असे अजित पवारांचे वेळापत्रकही चंद्रकांत पाटील यांनी ठरवून दिले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
“आरडाओरडा करुन, धाकदपटशाने माणसं कामाला लागत नाहीत. अतिशय प्रेमाने त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपल्याला काम करावं लागतं. पण प्रत्येकाची एक कार्यपद्धती असते, तशी दादांची (उपमुख्यमंत्री अजित पवार) आहे. पण वारंवार माझं तेही म्हणणं आहे, की दादांनी ही कार्यपद्धती अवलंबण्यासाठी रोज पुण्यात असायला पाहिजे. सकाळी 7 ते 1 मुंबईत काम करायचं, एकला निघायचं पिंपरी करायचं, पुणे करायचं, रात्री 10 ला परत जायचं. मुळात मुंबईत सध्या कामं काय आहेत, हेच मला कळत नाही, पण आहेत. 7 ते 1 मुंबई, 1 ते 3 प्रवास, 3 ते 5 पिंपरी, 5 ते 9 पुणे.. तुमचा धाक आहे ना, तो आठवड्यातून एकदा येऊन होणार नाही. रोज येऊन बसायला लागेल”
Chandrakant patil | अजितदादा, तुमचा धाक आठवड्यात एकदाच नको, रोज पुण्यात या – चंद्रकांत पाटील@ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/ryelBRInBc
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
हेही वाचा : मोकळं-ढाकळं व्यक्तिमत्व, रांगडा गडी, न पटणारं वय, फ्रायरब्रँड अजित पवारांचा धगधगता प्रवास
गेल्या आठवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी आमदार सभागृहाबाहेर रिपोर्टची प्रतीक्षा करत होते. एक-एक आमदाराच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाला. अखेर अजितदादांनी थेट अधिकाऱ्यांनाच प्रवेशद्वारावर बोलावून खडेबोल सुनावले आणि कर्मचाऱ्यांची शाळा घेतली होती. (Chandrakant Patil Suggests Ajit Pawar to visit Pune Pimpari daily)
याआधी, पुणे जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यास अधिकाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, अशा थेट शब्दात अजित पवार यांनी जुलै महिन्यात अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. पुण्यात नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असतानाही कारवाई होत नसल्याने अजित पवारांनी धारेवर धरले होते.
संबंधित बातम्या :
विधानभवनात कोरोना अहवालासाठी आमदार प्रवेशद्वारावर ताटकळत, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर
(Chandrakant Patil Suggests Ajit Pawar to visit Pune Pimpari daily)