उद्धव ठाकरेंना पीककर्ज आणि मध्यम मुदतीच्या कर्जातील फरक कळतो का? : चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chandrakant Patil vs Uddhav Thackeray) यांना पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जातील फरक तरी कळतो का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरेंना पीककर्ज आणि मध्यम मुदतीच्या कर्जातील फरक कळतो का? : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jan 09, 2020 | 12:02 PM

बारामती : “राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री नाराज आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात हे सरकार आपोआपच पडेल. त्यासाठी ताकद लावायची गरज नाही”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil vs Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chandrakant Patil vs Uddhav Thackeray) यांना पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जातील फरक तरी कळतो का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन दिलं.

याशिवाय सध्या अनेकजण सत्तेत असून नाराज आहेत, त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार आपोआप पडेल. त्यासाठी मेहनत कशाला घ्यायची, असा टोमणाही लगावला.

 महाविकास आघाडीनं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे असा आरोप करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्ज यातला फरक तरी कळतो का..? असा सवाल उपस्थित केला. मुळातच पीककर्जाची मर्यादा अत्यल्प असताना हे सरकार दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार असल्याचं सांगून फसवणूक करत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.