वेळ साधला अन् आपलं सरकार आलं; गेल्या अडीच वर्षांपासून…, चंद्रकांत पाटलांचा नव्या सरकारबाबत मोठा दावा
चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. मात्र हा दावा शिंदे गटाकडून फेटाळण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उठावानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान आता भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात सरकार आणण्यासाठी अडीच वर्षांपासून प्लॅनिंग करत होतो. वेळ साधला अन् आपलं सरकार आलं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी चंद्रकांत पाटलांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आमचं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं चंद्रकांत पाटील यांनी?
चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात सरकार आणण्यासाठी अडीच वर्षांपासून प्लॅनिंग करत होतो. वेळ साधला अन् आपलं सरकार आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
पाटलांच्या दाव्याचे खंडन
दरम्यान दुसरीकडे चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देतान शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमचं कसलंही प्लॅनिंग नव्हतं जे काय झालं ते उत्स्फूर्त होतं, असं म्हणत केसरकरांनी पाटलांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच आमच्याकडेच बहूमत असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळेल असंही यावेळी दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील बहूमतामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.