चंद्रकांतदादांकडून अजित पवारांना पहाटेच्या शपथेची आठवण, फडणवीस म्हणाले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका!

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेवरुन आज विधानसभेत चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली.

चंद्रकांतदादांकडून अजित पवारांना पहाटेच्या शपथेची आठवण, फडणवीस म्हणाले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका!
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 4:11 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेवरुन आज विधानसभेत चांगलीच (Chandrakant Patil Ajit Pawar oath) टोलेबाजी पाहायला मिळाली. मराठा समाजाच्या तरुणांचं आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मराठा समाजाचे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रश्नातून काही मार्ग निघत नाही. काही मुलांची सेवा सामावून घ्यावी अशी मागणी आहे. अजित पवार ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसा त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथविधी झाला” (Chandrakant Patil Ajit Pawar oath)

अजित पवारांनी मराठा आंदोलक तरुणांबाबत तसाच निर्णय घ्यावा असं चंद्रकांतदादांना सूचवायचं होतं. त्यासाठी त्यांनी अजित पवारांनी फडणवीसांसोबत घेतलेल्या शपथेचा दाखला दिला.

चंद्रकांत दादांच्या या दाखल्यानंतर अजित पवार म्हणाले, “दोन-तीन दिवसात मराठा आंदोलकांबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ. त्यात काही वेगळे मुद्दे आहेत”. मग अजित पवारांनी चंद्रकांतदादांनी दिलेल्या शपथेच्या दाखल्यावर भाष्य केलं. “चंद्रकांतदादा तुम्ही म्हणाला रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथ…. असं म्हणत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी मध्येच हस्तक्षेप केला. देवेंद्र फडणवीस लगेच बोलले की तुम्ही (अजित पवार) त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. मग अजित पवार म्हणाले ते (फडणवीस) बोलले म्हणून मी बोलत नाही.

देवेंद्र फडणवीस-अजित पवार शपथ

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरुन भाजपची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करुन, महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला. तिन्ही पक्षांची चर्चा आणि वाटाघाटी सुरु असतानाच, अजित पवारांनी 23 नोव्हेंबरला पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. मात्र अजित पवारांनी 3 दिवसांनी 26 नोव्हेंबरला राजीनामा दिल्याने फडणवीसांचं सरकार कोसळलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.