‘भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही’, एका मंत्र्याबाबत चंद्रकांत पाटालांचा खळबळजनक दावा

शरद पवार यांनी तर एका मुलाखतीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील जमीनदाराची उपमा दिली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसला टोले लगावले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केलाय.

'भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही', एका मंत्र्याबाबत चंद्रकांत पाटालांचा खळबळजनक दावा
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 9:22 PM

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मात्र अनेकदा विसंवाद पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर एका मुलाखतीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील जमीनदाराची उपमा दिली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसला टोले लगावले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केलाय. (Chandrakant Patil’s sensational claim about a minister in the Mahavikas Aghadi government)

उद्धव ठाकरे यांनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दात सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांने आपल्याकडे भावना वक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नेमक्या कोणत्या नेत्याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे, याबाबत नेमका अंदाज बांधणं कठीण आहे.

शरद पवारांनी काँग्रेसबाबत कोणतं उदाहरण दिलं?

‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.

नाना पटोलेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया द्यायला नको. असं म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 2024 ला काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार. कुणाला काय बोलायचं याचं लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, असंही पटोले टीव्ही 9 शी बोलताना म्हणाले.

‘ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला’

काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. 2024 मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलंय, असंही पटोले म्हणाले.

फडणवीसांचा काँग्रेसला टोला

“काँग्रेसचं वर्णन हे शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरु आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबहांनी केलं आहे आणि ते काँग्रेसला चपखल लागू पडतं”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

मुंबईतलं निर्भया बलात्कार कांड, मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना 5 मोठ्या सुचना, वाचा सविस्तर

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

Chandrakant Patil’s sensational claim about a minister in the Mahavikas Aghadi government

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.