चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह! पटोलेंविरोधातील आंदोलनात 2 वेळा सहभागी, पोलिसांनीही घेतलं होतं ताब्यात!
भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बावनकुळे यांनी ट्वीट करुन त्याबाबत माहिती दिलीय. सौम्य लक्षणं असून घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
नागपूर : राज्यात विविध राजकीय पक्षाचे नेते पुन्हा एकदा कोरोनाच्या कचाट्यात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बावनकुळे यांनी ट्वीट करुन त्याबाबत माहिती दिलीय. सौम्य लक्षणं असून घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती’, असं ट्वीट करत बावनकुळे यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती देत संपर्कातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती .
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 24, 2022
पटोलेंविरोधातील आंदोलन सहभाग
महत्वाची बाब म्हणजे नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपनं आठवड्याभरात दोन वेळा आंदोलन केलं. रविवारी संध्याकाळही बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपनं आंदोलन केलं. यावेळी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत, त्यांचा पुतळाही जाळण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तर पटोले यांनी ‘मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’ हे वक्तव्य केल्यानंतर बावनकुळे यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. त्यामुळे या दोन्ही आंदोलनावेळी बावनकुळे यांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणात लोक आल्यामुळे त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
शरद पवारही कोरोना पॉझिटिव्ह
पवार यांनी दुपारी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावीट, असं आवाहन पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
इतर बातम्या :